मराठीच तुरळक सिनेमे केले अन् आज मराठीचा मुद्दा..; रेणुका शहाणेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स

मराठीच तुरळक सिनेमे केले अन् आज मराठीचा मुद्दा..; रेणुका शहाणेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स

मराठी लोकांना इथे स्थान नाही, असं एका नोकरीच्या जाहिरातीत म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. गुजरातमधील एका फ्रीलान्स एचआर रिक्रूटरने ग्राफिक डिझायनरसाठीच्या मुंबईतील नोकरीची जाहिरात तिच्या लिंक्डइन अकाऊंटवर पोस्ट केली होती. परंतु या जाहिरातीत ‘मराठी लोकांचं इथे स्वागत नाही’ असा मजकूर लिहिल्याने नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही पोस्ट लिहिली आहे. ‘मराठी लोकांचं इथे स्वागत नाही म्हणणाऱ्यांना कृपया मत देऊ नका’, असं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं आहे. मात्र रेणुका यांच्या या पोस्टवरून काहींनी टीकासुद्धा केली आहे. मराठीत तुरळक सिनेमे केले, अन् आज मराठीचा मुद्दा काढून काय मिळवलं, असा सवाल एका युजरने केला.

रेणुका शहाणे यांची पोस्ट-

‘मराठी नॉट वेलकम म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे,’ अशा शब्दांत त्यांनी भूमिका मांडली. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘ज्या रेणुका ताई आज मराठीवर इतकं ज्ञान देत आहेत. त्यांनी हिंदीवर जास्त प्रेम करण्याचं काय कारण? मराठीत तुरळक सिनेमे केले अन् आज मराठीचा मुद्दा काढून काय मिळवलं आणि हे सोसायटी चेअरमनची निवडणूक नाही. राष्ट्रीय नेता निवडायचा आहे’, अशी टीका एका युजरने केली. त्यावर उत्तर देताना रेणुका यांनी लिहिलं, ‘तुम्हाला माझ्या निवेदनात नक्की काय बोचलं? मी कुठल्या भाषेत किती काम केलं हा मुद्दाच नाही आहे, पण मराठी भाषेचा किंवा लोकांचा अपमान करणार्‍या उमेदवारांना निवडून न आणणं ही आपली जबाबदारी आहे, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत. सोसायटी चेअरमनची निवडणूक असो किंवा राष्ट्रीय, आपल्या भाषेचा अपमान कुठेही का सहन करावा,’ असा सवाल त्यांनी संबंधित युजरला केला.

दरम्यान, मराठी लोकांचं इथे स्वागत नाही असा मजकूर असलेली जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होऊन नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागल्यानंतर संबंधित एचआरने माफी मागितली आहे. ‘मी खरोखर माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरच्या नोकरीसंदर्भातील जाहिरात पोस्ट केली होती आणि त्या जाहिरातीतील एका आक्षेपार्ह वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तुम्हाला कळवायचं आहे की मी अशा गोष्टींना समर्थन देत नाही, ज्यामध्ये कोणाशीही भेदभाव होईल. हे माझ्या दुर्लक्षामुळे झालं’, असं या एचआरने माफी मागताना म्हटलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एक्स्झ्लिुझिव्ह कंटेट मिळवण्याच्या या स्पर्धेत…. रोहित शर्माने स्पोर्ट्स वाहिनीला फटकारले एक्स्झ्लिुझिव्ह कंटेट मिळवण्याच्या या स्पर्धेत…. रोहित शर्माने स्पोर्ट्स वाहिनीला फटकारले
अनेकदा खेळाडूंचे प्रॅक्टिंस दरम्यान किंवा मॅचदरम्यान बोलतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी रोहीत शर्मा याने चक्क एका...
अफगाणिस्तानात पावसाचा हाहाकार, मदतीसाठी सैन्य तैनात; दिवसभरात 60 तर दोन आठवड्यात 370 जण दगावले
… तर अशी शिक्षा करू की संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल, राहुल गांधी यांचा इशारा
पुढील पाच दिवस देशात उष्णतेचा कहर, हवामान विभागाचा इशारा
Video एकाच व्यक्तीने 8 वेळा दिले भाजपला मत, काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत