मराठी ‘नॉट वेलकम’ म्हणणाऱयांना मत देऊ नका; अभिनेत्री रेणुका शहाणे संतापल्या

मराठी ‘नॉट वेलकम’ म्हणणाऱयांना मत देऊ नका; अभिनेत्री रेणुका शहाणे संतापल्या

अलीकडेच एका गुजराती   कंपनीची गिरगाव येथील कार्यालयासाठी नोकरभरतीसाठीची लिंक्डिनवरील जाहिरात व्हायरल झाली होती ज्यात ‘येथे मराठी लोकांचे स्वागत नाही,’ असे ठळकपणे नमूद केले होते. या जाहिरातीनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली असून मराठी माणसांना ’नॉट वेलकम’ म्हणणाऱया लोकांना कृपया मत देऊ नका, असे आवाहन त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केले आहे.

‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये रेणुका शहाणे यांनी म्हटलेय, मराठी ‘नॉट वेलकम’ म्हणणाऱया लोकांना कृपया मत देऊ नका… मराठी लोकांना घरे न देणाऱया लोकांचे समर्थन करणाऱया उमेदवारांना कृपया आपले बहुमूल्य मत देऊ नका… ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखले जाते, अशा लोकांचे समर्थन करणाऱया उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. पोस्टच्या शेवटी त्यांनी म्हटलेय, कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे. ऐन लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना रेणुका शहाणे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;