चंद्रपुरातील गोंडपिपरीतील तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू; मृतदेह सापडले

चंद्रपुरातील गोंडपिपरीतील तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू; मृतदेह सापडले

क्रिकेट खेळत असताना चेंडू तलावात पडल्याने चेंडू आणण्यासाठी दोघं मित्र तलावात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात घडली आहे. गौरव विलास ठाकूर ( 14 ), शौर्य भास्कर पिंपशेडे ( 15 ) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने गोंडपिपरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

या घटनेची माहिती इतर मित्रांनी मृतांच्या माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. तलावाचा पाळीवर दोघांचे कपडे आढळून आले आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले. उशिरापर्यंत शोधमोहीम राबविला गेली. मात्र, अंधार झाल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर बुधवारी पहाटेपासूनच मुलांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. त्यात पोलिसांना यश आले. दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;