काँग्रेस तुमचे आरक्षण काढून घेणार आणि मुस्लिमांना देणार! मोदींचे अंबाजोगाईत कॉपीपेस्ट भाषण

काँग्रेस तुमचे आरक्षण काढून घेणार आणि मुस्लिमांना देणार! मोदींचे अंबाजोगाईत कॉपीपेस्ट भाषण

शभरात वाहत असलेल्या विरोधी लाटेमुळे धास्तावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबाजोगाईत पुन्हा एकदा काँग्रेस तुमचे आरक्षण काढून घेणार आणि ते मुस्लिमांना देणार असल्याचे कॉपीपेस्ट भाषण केले. मुंबईवर हल्ला करणाऱया अतिरेक्यांबद्दल काँग्रेसला उमाळा आला असून या हल्ल्यात शहीद झालेल्यांचा काँग्रेस अपमान करत असल्याचा आरोपही मोदींनी केला. महाराष्ट्रातील दुष्काळाला काँग्रेस जबाबदार असल्याचेही ते म्हणाले.

बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाईत जाहीर सभा झाली. या सभेत मोदींनी चारशेपार, गॅरंटीबद्दल चकार शब्दही काढला नाही. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. काँग्रेस सत्तेत आल्यास कलम 370 पुन्हा आणले जाईल, नागरिकत्व कायदा रद्द करण्यात येईल, तीन तलाक कायदाही बासनात गुंडाळून ठेवण्यात येईल, किसान सन्मान योजना, मोफत धान्य योजना, वैद्यकीय उपचार आदी योजनाही गुंडाळल्या जातील. एवढेच काय काँग्रेस राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकालही काँग्रेसवाले पलटणार आहेत. मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस प्रभू श्रीराम आणि रामभक्तांचा पदोपदी अपमान करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;