रत्नागिरी-सिंधुदुर्गात पाच वाजेपर्यंत 53.75 टक्के मतदान

रत्नागिरी-सिंधुदुर्गात पाच वाजेपर्यंत 53.75 टक्के मतदान

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मतदारसंघात 53.75 टक्के मतदान झाले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर 14 लाख 51 हजार 630 मतदार आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला शांततेत सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर 11 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 21.29 टक्क्यावर पोहोचली. दुपारी एक वाजेपर्यंत 33.91 टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत 44.73 टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 53.75 टक्के मतदान झाले.

त्यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात 52.62 टक्के, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 49.83 टक्के, राजापूर विधानसभा मतदारसंघात 47.31 टक्के, कणकवली विधानसभा मतदारसंघात 55.14 टक्के, कुडाळ विधानसभा मतदारसंघात 59.09 टक्के, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 60.03 टक्के मतदान झाले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;