"तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते", मोहिते पाटलांची पवारांवर जहरी टिका, शिरूरचं वातावरण तापलं

अजित पवारांकडून शिवाजीराव आढळराव पाटील; तर शरद पवारांकडून अमोल कोल्हे रिंगणात

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शिरूरमध्ये पहिल्यांदाच दोन्ही पवारांमध्ये हाय व्होल्टेच सामना बघायला मिळत आहे. अजित पवारांकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवारांकडून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पुणे : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शिरूरमध्ये पहिल्यांदाच दोन्ही पवारांमध्ये हाय व्होल्टेच सामना बघायला मिळत आहे. अजित पवारांकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवारांकडून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता दोन्ही बाजूच्या गटाकडून एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या शिरूरमध्ये राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. 

अजितदादा गटातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. कांद्याचे, दुधाचे दर कोसळण्याला थेट शरद पवारांना जबाबदार धरलं आहे. शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते. अशी घणाघाती टिका मोहिते पाटलांनी शरद पवारांवर केलीय. 

यावेळी दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, शरद पवार कृषीमंत्री होते. तेव्हा त्यांनी एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांची ही अवस्था झाली नसती. तुम्ही कधीही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासोबत बसून चर्चा केली नाही. आज ती चर्चा केली असती तर शेतकरी चांगलाच सुखावला असता. त्यावर देशात कृषी खात्यामध्ये फार पुढे गेला आहे. देश निर्यातीपर्यंत पोहोचला आहे. कांदा निर्यात करायच्या वेळी निर्यात बंदी करण्यात आली. असं तुमचं सरकार करत असेल तर तुम्ही झोपा काढत होता का ? असा सवाल जयंत पाटलांनी मोहिते पाटलांना केलाय. तर मोहिते सत्तेत जाण्यासाठी कसे लाचार झालेत आणि ते कसे महागद्दार आहे. हे सांगताना कोल्हेंनी गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी भूमिका कशा घेतल्या. याचा पाढाच वाचला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मागील १५ वर्षांत मी काम केलं, अन् त्यांनी ५ वर्षात फक्त कामाचा अभिनय केला मागील १५ वर्षांत मी काम केलं, अन् त्यांनी ५ वर्षात फक्त कामाचा अभिनय केला
मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी एकही प्रकल्प आपल्या भागात आणला आही.  जी कामं ते आपल्या सोशल मिडियावर दाखवत असतात,...
शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद
‘शिवा’ मालिकेत अखेर तो क्षण आलाच; प्रपोजलला काय असेल आशुचं उत्तर?
जेंव्हा सावत्र बहीण ईशाच्या लग्नाला नव्हते पोहचले सनी आणि बॉबी देओल, धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात थेट..
मला सांगताना खूप वाईट वाटतंय..; गौरव मोरेनं जाहीर केला मोठा निर्णय
नवरा मारून टाकेल या भीतीने अभिनेत्री करायची असं काम, पती आहे प्रसिद्ध उद्योजक
मराठीच तुरळक सिनेमे केले अन् आज मराठीचा मुद्दा..; रेणुका शहाणेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स