रोज रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होते? काहीच दिवसात जाणवतील ‘हे’ चमत्कारीक बदल

रोज रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होते? काहीच दिवसात जाणवतील ‘हे’ चमत्कारीक बदल

किचनमध्ये असणारे मसाले फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसतात तर आरोग्यासाठीही तेवढेच महत्त्वाचे असतात. असे अनेक मसाले आहेत ज्या अनेक आजारांसाठी रामबाण उपाय ठरतात. गरम मसाल्यांमधील एक म्हणजे लवंग. गरम मसाल्यातील लवंग बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. लवंगमुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्यासही लाभ मिळतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात. अमेरिकेतील एका प्रसिद्ध डॉक्टरने लवंग खाण्याचे फायदे सांगितले आहेत,जे जाणून घेतल्यास तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

रात्री लवंग खाणे किंवा लवंगाचे पाणी पिण्याचे फायदे काय होतात

1. पचनप्रक्रिया सुधारते

झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास किंवा लवंगाचे पाणी प्यायल्यास अपचन आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतील.

2. चांगली झोप येण्यास मदत होते

लवंगमध्ये अशा काही नैसर्गिक तत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे तणाव कमी होऊन मेंदू शांत होण्यास मदत मिळते आणि झोप चांगली येईल.

3. यकृत डिटॉक्स होईल

लवंगातील औषधी गुणधर्मामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर सहजरित्या फेकले जाण्यास मदत मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल.

4. सर्दी-खोकला दूर होईल

लवंगाची प्रकृती उष्ण आहे आणि यातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे घशातील खवखव, खोकला-सर्दी, कफच्या समस्येतून सुटका मिळेल

5. दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर

रात्री झोपण्यापूर्वी लवंग चावून खाल्ल्यास तोंडाला येणारा दुर्गंध कमी होईल. तसेच तोंडाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. विशेषतः दात दुखीपासून आराम मिळू शकतो.

6. हृदय आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल

लवंगाचे पाणी प्यायल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारेल आणि यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.

7. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल

लवंगमधील अँटी-मायक्रोबिअल गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल.

लवंगाचे पाणी कस तयार करावे?

चार ते पाच लवंग एक कप पाण्यात उकळा.
उकळ आल्यानंतर पाच मिनिटे गॅसच्या मध्यम आचेवर पाणी गरम करावे.
गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे.
लवंगाचे पाणी तयार झाल्यानंतर जवळपास एक तासानंतर पाणी प्यावे
झोपण्यापूर्वी 30 मिनिटे आधी लवंगाचे पाणी प्यावे. यामुळे काही दिवसांत शरीरामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतात.
मर्यादित स्वरुपातच लवंगाचे पाणी प्यावे.

(महत्त्वाची टीप: लवंगाचे पाणी हे मर्यादित प्रमाणातच सेवन करावे अन्यथा त्याचा गरमपणा शरीराला बाधा करू शकते, तसेच प्रेग्नंट महिलांनी लवंग खाण्याआधी किंवा लवंगाचे पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोज रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होते? काहीच दिवसात जाणवतील ‘हे’ चमत्कारीक बदल रोज रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होते? काहीच दिवसात जाणवतील ‘हे’ चमत्कारीक बदल
किचनमध्ये असणारे मसाले फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसतात तर आरोग्यासाठीही तेवढेच महत्त्वाचे असतात. असे अनेक मसाले आहेत ज्या अनेक आजारांसाठी...
दररोज गाजराचा ज्युस पिल्याने काय होते? खरंच वजन वाढते का? जाणून घ्या
पत्नीपीडित पुरुष आश्रमात शीर्षासन करून ‘जागतिक पुरुष दिन’ साजरा
हिवाळ्यात असं काय होतं ज्यामुळे वाढतात रक्तदाबाचे रुग्ण, कोणी आणि कशी घ्यावी काळजी? घ्या जाणून
राजापूर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी मजबूत, कॉंग्रेसच्या हुस्नबानू खलिफे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात
भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी
मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक