जमिनीवर बसून जेवण करण्याचे काय फायदे आहेत?
जमिनीवर बसून जेवणे हा आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीचा एक भाग मानला जातो. आता मात्र बहुतेक लोक जेवणाच्या टेबलवर बसून जेवतात. ही पद्धत निश्चितच सोयीस्कर आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की जमिनीवर बसून जेवल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जमिनीवर बसून जेवल्यामुळे पोटावर हलका दाब पडतो, यामुळे पचनक्रिया सुधारते. या आसनामुळे पोटाभोवतीचे स्नायू सक्रिय होतात, ज्यामुळे अन्न पचणे सोपे होते.
जमिनीवर बसून जेवताना आपल्या शरीराची ठेवण ही फार योग्यरीत्या असते. त्यामुळे पोटाची होणारी सौम्य हालचाल आतड्यांचे कार्य सुधारते. यामुळे गॅस आणि आम्लता सारख्या समस्या कमी होतात.
जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा सरळ राहण्यास मदत होते आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. या पोश्चरमुळे हळूहळू शरीर अधिक लवचिक होते. खुर्चीवर सतत बसल्याने पोश्चर बिघडते, तर जमिनीवर बसल्याने पोश्चर सुधारण्यास मदत होते.
जमिनीवर बसून जेवल्याने तुम्हाला अन्नावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. यामुळे जास्त खाण्याची शक्यता कमी होते.
आरोग्यात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर दिवसातून किमान एकदा जमिनीवर बसून जेवण्याचा प्रयत्न करायलाच हवा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List