आता फितुरी केले तर परिणाम भोगावेच लागतील, रोहित पवार यांची मिंधे गटाचे आमदार शहाजी बापू यांच्यावर टीका
भाजपचे राजकारण हिडीस, बलात्कारासारखे आहे अशी टीका मिंधे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली होती. त्यावर आता फितुरी केले तर परिणाम भोगावेच लागतील अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजप नेतृत्वाने मिंध्यांचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना एकाकी पाडत शेकापसह सर्व पक्षीय आघाडी करुन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या या राजकीय खेळीने शहाजीबापू चांगलेच संतप्त झालेत. भाजपने केलेली ही खेळी हिडीस, किळसवानी, दहशतवादी आणि एखाद्या अबलेवर केलेली बलात्कारी कृती असल्याचे सांगत पाटलांनी भाजपावर आसूड ओढत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
यावर रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्राची राजकीय सुसंस्कृत परंपरा यासंदर्भात शहाजी बापूंनी गुवाहाटीच्या दऱ्या, डोंगर, हिरवळ, हाटेल बघण्याआधी विचार करायला हवा होता. आता फितुरी केले तर परिणाम भोगावेच लागतील, स्वाभिमान गहाण टाकावाच लागेल. असो उशिरा का होईना शहाणपण सुचलं ते महत्वाचं आहे असेही रोहित पवार यांनी यावेळी म्हटले.
महाराष्ट्राची राजकीय सुसंस्कृत परंपरा यासंदर्भात शहाजी बापूंनी गुवाहाटीच्या दऱ्या, डोंगर, हिरवळ, हाटेल बघण्याआधी विचार करायला हवा होता. आता फितुरी केले तर परिणाम भोगावेच लागतील, स्वाभिमान गहाण टाकावाच लागेल. असो उशिरा का होईना शहाणपण सुचलं ते महत्वाचं आहे .@ShahajibapuP pic.twitter.com/cAzqUAnHzD
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 19, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List