अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार जमाल खाशोगी हत्या प्रकरणात सौदी राजकुमारांना दिली क्लीन चिट, म्हणाले अशा गोष्टी घडत राहतात..
वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (एमबीएस) यांना क्लीन चिट दिली आहे. मंगळवारी रात्री उशिरा व्हाईट हाऊसमध्ये एमबीएससोबत माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, युवराजांना या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. खाशोगी हे एक अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व होते. आमच्या पाहुण्याला अशा पद्धतीने का वागवले जात आहे असे म्हणत ट्रम्प म्हणाले, अशा गोष्टी होत राहतात.
२०१८ मध्ये इस्तंबूलमधील सौदी दूतावासात खाशोगीची हत्या करण्यात आली होती. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, प्रिन्स सलमानने खाशोगीच्या हत्येला परवानगी दिली होती, त्यानंतर प्रिन्स सलमानवर मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय टीकेचा सामना करावा लागला होता.
मंगळवारी ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये सौदी क्राउन प्रिन्सचे स्वागत केले. यादरम्यान एबीसी न्यूजच्या एका पत्रकाराने त्यांना २०१८ मध्ये झालेल्या सौदी पत्रकार जमाल खाशोगीच्या हत्येबद्दल प्रश्न विचारला तेव्हा, ट्रम्पने त्या रिपोर्टरला म्हटले की, एबीसी न्यूजला बनावट बातम्या देण्यात अग्रेसर आहे. अधिक बोलताना ते म्हणाले, “तुम्ही अशा व्यक्तीचा (खाशोगी) उल्लेख करत आहात जो खूप वादग्रस्त होता. तुम्ही ज्या माणसाबद्दल बोलत आहात तो बऱ्याच लोकांना आवडत नाही.”
ट्रम्प पुढे म्हणाले, “तुम्हाला आवडो किंवा न आवडो, अशा गोष्टी घडतात, पण (क्राउन प्रिन्स) यांना त्याबद्दल काहीही माहिती नव्हती. तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न विचारून आमच्या पाहुण्याला लाजवण्याची गरज नाही.” ट्रम्प यांचे नवीन विधान २०२१ च्या अमेरिकन गुप्तचर मूल्यांकनाच्या विरोधात आहे, ज्यामध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला होता की २०१८ मध्ये इस्तंबूलमधील सौदी वाणिज्य दूतावासात खशोगीच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या ऑपरेशनला क्राउन प्रिन्सने मान्यता दिली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List