Ratnagiri News – चिपळुणात बॅनरचीच चर्चा, पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये; नेट द्या मत घ्या

Ratnagiri News – चिपळुणात बॅनरचीच चर्चा, पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये; नेट द्या मत घ्या

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील तळवडे गावात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि राजकीय पुढार्‍यांना विचार करायला लावणारा फलक (बॅनर) लागला आहे. पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये, आमच्या भावना समजून घ्या… नेट द्या, मत घ्या! असा थेट आणि स्पष्ट संदेश देणारा हा बॅनर सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. हा बॅनर कोणी लावला, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, गावातील नागरिकांनी विकासकामांच्या मुद्यावर आता कोणतीही कोरी आश्वासने स्वीकारायची नाहीत, अशी ठाम भूमिका घेतल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

तळवडे गावात सध्या इंटरनेट अर्थात मोबाईल टॉवरची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. देशात आणि राज्यात डिजिटल क्रांती झाली असताना तळवडे गाव मात्र आजही डिजिटल अंध:कारात आहे. शिक्षण, आरोग्य, बँकिंग व्यवहार, सरकारी योजनांची माहिती तसेच ऑनलाईन सेवा अशा प्रत्येक अत्यावश्यक बाबींसाठी इंटरनेट अनिवार्य असतानाही गावातील एकाही टेलिकॉम कंपनीचा मोबाईल टॉवर उभारला गेलेला नाही. यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या गंभीर समस्येचे पडसाद आता थेट निवडणुकांच्या तोंडावर उमटले आहेत. तळवडे गाव म्हणतंय आता गावात इंटरनेट कनेक्शन पाहिजेच! असा स्पष्ट इशारा देत गावकऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या संभाव्य गावभेटींवर एकप्रकारे बहिष्कार टाकल्याचे चित्र आहे. गावातील तरुण, विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदार वर्ग इंटरनेटअभावी सर्वाधिक त्रस्त आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी गावातून बाहेर जावे लागते. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना, बँकेचे व्यवहार तसेच रोजगाराच्या संधींची माहिती वेळेत मिळत नाही. काही वेळा महत्त्वाची, विशेषतः दु:खद माहिती वेळेत न पोहचल्याने गैरसोयींना सामोरे जावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

सध्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याने अनेक राजकीय नेते तळवडे गावात मतदारांच्या भेटीगाठीसाठी येत आहेत. मात्र, गावात लावलेला हा बॅनर त्यांना थेट आव्हान देत आहे. निव्वळ आश्वासने देऊन मते मिळवण्याचा काळ आता संपला असून, ग्रामस्थ आता आधी विकास, मग मत या भूमिकेवर ठाम असल्याचे या बॅनरने दाखवून दिले आहे. या लक्षवेधी फलकामुळे आता तरी संबंधित कंपन्या आणि राजकीय नेते तळवडे गावातील इंटरनेटच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक
मानवी जीवनावर एक गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. अमेरिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच मानवाला प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या बर्ड फ्लू...
Ramdev Baba: केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
हिंदुस्थानवर हल्ला करू असा इशारा दिलेला, आमच्या सैनिकांनी ते केलं; दिल्ली स्फोटात सामील असल्याची पाकिस्तानची कबुली
नितीश कुमार 10 व्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, गुरुवारी होणार शपथविधी सोहळा
राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिमध्ये हिमांशू नांदलची गोल्डन हॅट्ट्रिक
पश्चिम बंगालमध्ये SIR सुरू झाल्यापासून आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दावा, EC ला ठरवलं जबाबदार
Delhi Bomb Blast – मला काही झाल्यास मोबाईल पाण्यात फेकून दे….; उमरच्या भावाने सांगितले सत्य