ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धर्मांध बनवण्याचा पाकिस्तान, दुबईतून प्रयत्न; सुरक्षा यंत्रणेने डाव उधळला

ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धर्मांध बनवण्याचा पाकिस्तान, दुबईतून प्रयत्न; सुरक्षा यंत्रणेने डाव उधळला

ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांची माथी भडकवण्याचा, धर्मांध विचारधारेकडे नेण्याचे प्रयत्न पाकिस्तान आणि दुबईतून सुरू होते. मात्र सुरक्षा यंत्रणनेने गेल्या 48 तासात असे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

दिल्लीतील बॉम्बस्फोटाशी संबंधित पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad) च्या दहशतवादी मॉड्यूलच्या चौकशीदरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी सीमेपलीकडून होणारा ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धर्मांध बनवण्याचा एक प्रयत्न हाणून पाडला.

एनडीटीव्हीने यासंदर्भात विशेष वृत्त प्रसिद्ध केले आहे. मिळालेल्या विशेष माहितीनुसार, गेल्या 48 तासात, अनेक सोशल मीडिया हँडल आणि फोन नंबरने जम्मूतील पूंछ, राजौरी, डोडा आणि किश्तवाड जिल्ह्यांमधील तरुणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हँडल आणि नंबर पाकिस्तान, पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (PoK) आणि दुबईतून ऑपरेट केले जात होते. हिंदुस्थानी यंत्रणांनी त्यांचा मागोवा घेतला आणि त्यांना ब्लॉक केले.

लक्ष्ये कशी ओळखली गेली?

दहशतवादी हँडलर्स त्यांच्या भरतीसाठी सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून होते. ते धर्मांध प्रवृत्तीकडे (extremist tendency) कल असलेल्या तरुणांना शोधत होते. खात्री झाल्यावर, ते प्रथम त्यांना धर्मासंदर्भातील साहित्य पाठवतात आणि नंतर त्यांची माथी भडकावण्यासाठी (indoctrinate) आपल्या विचारांचे प्रचार साहित्य (propaganda content) पाठवण्यास सुरुवात करतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र, त्यांची ही कार्यप्रणाली (modus operandi) अयशस्वी झाली. जैश-ए-मोहम्मदच्या ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यापासून सुरक्षा यंत्रणा सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत. या मॉड्यूलमध्ये सुरक्षा तपासणीची दिशाभूल करण्यासाठी डॉक्टरांसारख्या व्यावसायिकांची भरती केली जात होती.

काही दिवसांपूर्वी, दोन अल्पवयीन मुलांकडून चालवली जात असलेली दोन धर्मांध सोशल मीडिया हँडल ओळखण्यात आली होती. लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी गटाची प्रॉक्सी (proxy) संघटना असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) शी संबंधित पाकिस्तानस्थित प्रचारक अहमद सालार उर्फ साकिब याच्या मार्गदर्शनाखाली ही हँडल चालवली जात होती.

सालार सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करायचा. खोटी माहिती आणि दहशतवादी कृत्यांचे उदात्तीकरण करून त्यांच्यावर प्रभाव पाडत होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भरतीवर लक्ष केंद्रित

जैश-ए-मोहम्मद आपल्या महिला ब्रिगेडसाठी, जमात-उल-मोमिनात साठी भरती करण्यावरही लक्ष केंद्रित करत असल्याचे मानले जात आहे. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात लखनौ येथील शाहीन सईदला अटक झाली आणि तिचे आत्मघाती हल्लेखोर तसेच इतर संशयितांशी असलेले संबंध यातून या संघटनेच्या खोल दहशतवादी योजना आणि त्यांच्या व्यापकतेची कल्पना येते.

या महिला ब्रिगेडचे नेतृत्व जैशचा म्होरक्या मसूद अझहरची बहीण सादिया अझहर करते. सादिया आणि दुसरी बहीण, समैरा, यांना सदस्यांना त्यांच्या गटात आणण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण-सह-भरती मोहीम चालवण्याचे काम सोपवण्यात आले आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी ‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी
बऱ्याचदा आपण चवीच्या हव्यासापोटी अनेकदा जंकफुडचे सेवन करतो. पण या सर्वांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन...
अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे, वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल
पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आजपासून आंदोलन
ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धर्मांध बनवण्याचा पाकिस्तान, दुबईतून प्रयत्न; सुरक्षा यंत्रणेने डाव उधळला
मिंधेंचा रुसवा फुगवा कायम? पोलीस दलाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवारांची हजेरी, शिंदेंची मात्र दांडी
शिंदेचे मंत्री आता त्यांचंही ऐकत नाहीत, फडणवीस त्यांचे बॉस झालेयत; अंबादास दानवे यांचा टोला
जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यात 899 शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल, सर्वाधिक प्रमाण छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात