अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे, वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल
बदलत्या ऋतूनुसार आपले आहार व इतर जीवनशैलीत बदल होत असतो. तसेच आताच सुरू झालेल्या हिवाळ्याच्या हंगामात आपण आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेत असतो. तर या हिवाळ्यात आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स खाणे सुद्धा आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. हिवाळ्यात काजू खाल्ल्याने शरीर उबदार आणि निरोगी राहण्यास मदत होते. त्यासोबतच अक्रोड खाणे खूप फायदेशीर ठरू शकते, परंतु लोकं अक्रोड कसे खावे याबद्दल अनेकदा संभ्रमात असतात. अक्रोड हे सर्वात महागड्या बियांपैकी एक आहे. आरोग्य तज्ञांच्या मते दिवसातून किमान दोन अक्रोड खावेत. पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या अक्रोडांना सुपरफूड म्हणतात. तर हे अक्रोड खाल्ल्याने तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय, अक्रोड खाल्ल्याने हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारते.
आयुर्वेद तज्ञांच्या मते, हिवाळ्यात अक्रोड खाल्ल्याने चयापचय वाढतो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि हृदय आणि मेंदूच्या आरोग्याला फायदा होतो. पण यासोबतच अक्रोड रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने कोणते फायदे तुमच्या शरीराला होतात? अक्रोड खाण्याची योग्य वेळ कोणती? ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
अक्रोड भिजवल्यानंतरच का खावे?
आरोग्य तज्ञांच्या मते, अक्रोड भिजवून खावेत. भिजवल्यानंतर अक्रोड मध्ये असलेले काही चांगले एंजाइम तयार होतात, जे पचण्यास सोपे असतात, म्हणूनच अक्रोड भिजवून खाण्याची शिफारस केली जाते. भिजवल्याने त्यामध्ये असलेले फायटिक ॲसिड कमी होते. हे ॲसिड शरीराला पोषक तत्वे पूर्णपणे शोषण्यापासून रोखते. भिजवल्याने शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजे अधिक सहजपणे शोषता येतात.
ओमेगा 3 फॅटी ॲसिडस्
अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूच्या पेशींसाठी आवश्यक असते. दररोज भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. त्यामध्ये आढळणारे हेल्दी फॅट रक्तातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
पचनासाठी फायदेशीर
भिजवलेल्या अक्रोडमध्ये भरपूर फायबर असते, जे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
त्वचेसाठी फायदेशीर
अक्रोड खाणे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List