‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी
बऱ्याचदा आपण चवीच्या हव्यासापोटी अनेकदा जंकफुडचे सेवन करतो. पण या सर्वांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला पोटाच्या समस्या सतावू लागतात. त्यात आम्लतेकडे दुर्लक्ष केले तर पोटदुखी आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. तर आजच्या लेखात आपण अशा पाच पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्ही तुमच्या आहारातून काढून टाकले पाहिजेत जेणेकरून तुमच्या पोटाच्या समस्या कमी होतील.
मसालेदार आणि तळलेले पदार्थ
तळलेले आणि मसालेदार पदार्थांमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा मसालेदार तेलकट पदार्थ खाता तेव्हा ते पचवण्यासाठी तुमच्या पोटाला सामान्यपेक्षा जास्त आम्ल तयार करावे लागते. शिवाय मिरच्या आणि गरम मसाल्यांमधील असलेले रसायन तुमच्या पोटातील आतड्यांना त्रास देतात, ज्यामुळे जळजळ आणि वेदना होऊ लागते.
आंबट फळं आणि टोमॅटो
द्राक्ष, लिंबू, संत्री आणि टोमॅटो सारख्या फळांमध्ये नैसर्गिकरित्या आम्लयुक्त असतात. जर तुम्हाला आधीच पित्ताचा त्रास असेल, तर ही फळे किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ तुमच्या पोटातील आम्ल पातळी अचानक वाढवू शकतात, ज्यामुळे छातीत जळजळ आणि अस्वस्थता वाटू लागते.
चहा, कॉफी आणि सोडा
सकाळचा चहा किंवा कॉफी तुम्हाला ताजेतवाने करत असले तरी, त्यातील कॅफिन तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करतात. चहा, कॉफी आणि सोड्याचे प्रमाण जास्त झाल्यास जळजळ होते.
प्रक्रिया केलेले आणि जंक फूड
चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स, बर्गर आणि पिझ्झा यांसारख्या जंक फूडमध्ये अनेकदा अस्वास्थ्यकर फॅट मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह्ज जास्त असतात. तर अशा पदार्थांचे पचन केल्यास ते पचवणे पोटासाठी आव्हानात्मक असू शकते, ज्यामुळे आम्ल उत्पादन वाढते, ज्यामुळे गॅस, पोटफुगी आणि पोटदुखी होऊ शकते.
तुमच्या आहारातून हे काही पदार्थ वगळण्याचा प्रयत्न करा. काही दिवसांतच तुम्हाला आम्लपित्त आणि पोटदुखीमध्ये लक्षणीय चांगला परिणाम दिसून येईल. तुमचा आहार संतुलित करा, भरपूर पाणी प्या आणि वेळेवर जेवण करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List