सोने तीन दिवसांत पाच हजारांनी घसरले
सोने आणि चांदीच्या दरात मागील तीन दिवसांत चांगलीच घसरण झाली आहे. सोन्याच्या किमतीत पाच हजारांची, तर चांदीच्या दरात दहा हजारांची घसरण झाली आहे. मंगळवारी सोने दीड हजारांनी स्वस्त होऊन प्रति तोळा 1 लाख 21 हजार 366 रुपयांवर पोहोचले. 13 नोव्हेंबर रोजी सोने 1 लाख 26 हजार 554 रुपये प्रति तोळा होते. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदी 3 हजार रुपयांनी स्वस्त झाली असून प्रति किलो 1 लाख 51 हजार 850 रुपयांवर पोहोचली आहे. मागील गुरुवारी चांदी 1 लाख 62 हजार 730 रुपये होती. सोन्याच्या किमतीत जीएसटी, मेकिंग चार्जेस आणि ज्वेलर्स मार्जिन समाविष्ट नाही. त्यामुळे शहरांनुसार दर वेगवेगळे असू शकतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List