मुंबईत परवडणाऱ्या घरांची घोषणा, निवडणुकीसाठी महायुतीचे गाजर

मुंबईत परवडणाऱ्या घरांची घोषणा, निवडणुकीसाठी महायुतीचे गाजर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत महायुती सरकारने मुंबई आणि परिसरात परवडणाऱ्या घरांची घोषणा केली. त्यासाठी मुंबई आणि उपनगरातील जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या  म्हाडाच्या 56 वसाहतींच्या समूह पुनर्विकासासाठीच्या सर्वंकष धोरणाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  त्यामुळे म्हाडाच्या वसाहतींचा समूह पुनर्विकास होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी 1950 ते 1960च्या दरम्यान 56 वसाहतींची निर्मिती केली. या वसाहतींमध्ये सुमारे पाच  हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. 65 वर्षांपूर्वी बांधलेल्या या  इमारतींचे बांधकाम जीर्ण झाल्याने म्हाडाने या इमारतींच्या एकत्रित-समूह पुनर्विकासाचे धोरण तयार केले आहे. या पुनर्विकासामुळे रहिवाशांना आधुनिक स्वरूपाच्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये आधुनिक सुविधांनी युक्त अशी सदनिका, उद्वाहन, प्रशस्त वाहनतळ, उद्यान, सभागृह, खेळाची मैदाने, व्यायामशाळा, जलतरण तलाव, सीसीटीव्ही सुविधा यांचा समावेश आहे.

म्हाडा नियोजन प्राधिकरण

या परिसरात पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा, रस्ते, वीज आदी पायाभूत सुविधा अत्याधुनिक संरचनेच्या  तसेच पर्यावरणपूरक असणार आहेत. यामुळे रहिवाशांना पूर्वीपेक्षा मोठी घरे उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्प आराखडय़ामध्ये हरित क्षेत्र, शाळा, आरोग्य सुविधा, वाणिज्यिक जागा असे संपूर्ण वसाहतीचे एकत्रित नियोजन केले जाणार आहे. या पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील 114  प्रकल्पांसाठी म्हाडा नियोजन प्राधिकरण राहणार आहे. गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती गठीत करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

रहिवाशांची संमती आवश्यक नाही

या धोरणात उच्चतम पुनर्वसन चटईक्षेत्र उपलब्ध होणार असल्याने पुनर्विकासासाठी  रहिवाशांची संमती घेणे आवश्यक राहणार नाही. तथापि निविदा प्रक्रियेतून नियुक्त करण्यात येणाऱ्या विकासकास गृहनिर्माण संस्थांचा सहमतीदर्शक ठराव घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आयकॉनिक शहर विकासाचे धोरण

सिडकोसह राज्यातील विविध प्राधिकरणांकडील भूखंडांचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासाच्या धोरणास मान्यता देण्यात आली. 

56 वसाहतींना फायदा

मुंबई आणि उपनगरातील जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या  म्हाडाच्या 56 वसाहतींच्या समूह पुनर्विकासासाठीच्या  सर्वंकष धोरणाला मान्यता दिली आहे. 20 एकर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळावरील म्हाडा प्रकल्पांसाठी हे धोरण राबविण्यात येणार आहे.

आयकॉनिक शहर धोरण

सिडकोसह राज्यातील विविध प्राधिकरणांकडील भूखंडांचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासाच्या आदर्श धोरणासही मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे  संबंधित प्राधिकरणाला बांधकाम आणि विकास संचलनकर्त्यांची (सिडीओज) निविदा प्रक्रियेद्वारे नेमणूक करता येणार आहे. यामुळे सिडीओजला निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी करता येईल. त्याला विकासाचे हक्क मिळतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देश- विदेश – 17 फेब्रुवारीला पहिले सूर्यग्रहण देश- विदेश – 17 फेब्रुवारीला पहिले सूर्यग्रहण
2026 मधील पहिले सूर्यग्रहण 16 फेब्रुवारीला मंगळवारी होईल, परंतु हे सूर्यग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण एक वर्तुळात म्हणजेच रिंग...
उद्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 6तास बंद राहणार
मिंध्यांच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार; भाजपकडून राजकीय आणि आर्थिक नाकाबंदीमुळे घुसमट – स्फोट करण्याचा इशारा, फडणवीसांनी शिंदेंसमोरच मंत्र्यांना उडवून लावले
परत कुणीतरी गावाला जाणार, आदित्य ठाकरे यांनी डिवचले
पार्थ पवारांचे नावच नाही… क्लीन चिट! मुंढवा जमीन घोटाळ्याचा चौकशी अहवाल आला
शिक्षकांच्या बदल्या 30 मेनंतर नकोत, हायकोर्टाचे आदेश; 53 वर्षे पूर्ण झालेल्यांना दुर्गम भागात बदली नाही
मुंबईत परवडणाऱ्या घरांची घोषणा, निवडणुकीसाठी महायुतीचे गाजर