उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीमध्ये बाद, अजित पवार गटाविरुद्ध खुन्नस वाढली; राष्ट्रवादीचा झेंडा जाळून विजयोत्सव

उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीमध्ये बाद, अजित पवार गटाविरुद्ध खुन्नस वाढली; राष्ट्रवादीचा झेंडा जाळून विजयोत्सव

राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीत आज नवीनच ट्विस्ट आला आहे. पोलीस बंदोबस्तात सोमवारी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज सूचकाची सही नसल्याने छाननीमध्ये नामंजूर करण्यात आला आहे. यानंतर माजी आमदार राजन पाटील समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा जाळून विजयोत्सव साजरा केला. यामुळे मोहोळ तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध राजन पाटील समर्थकांची खुन्नस वाढल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवाराचा अर्ज मंजूर झाल्याने पाटील कुटुंबीयांना बिनविरोध निवडीसाठी उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून अजित पवार गटाला उघड आव्हान दिले आहे. अनगर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नगरसेवक पदासाठी एकही उमेदवार मिळाला नाही. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उज्ज्वला थिटे यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात त्यांनी थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद झाल्याने संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.

माजी आमदार, भाजपाचे नेते राजन पाटील यांच्या समर्थकांचे 17 नगरसेवक बिनविरोध झाल्यानंतर आणि उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात एकेरी भाषा वापरत घोषणाबाजी करण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा घडय़ाळ चिन्ह असलेला झेंडा जाळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अनगरमध्ये तब्बल तासभर फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी सुरू होती.

मोहोळमध्ये पर्यायाने अनगरमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीवरून राजन पाटील यांच्या समर्थकांची अजित पवार यांच्याविरुद्ध खुन्नस असल्याचे चित्र उघडपणे समोर आले आहे. राजन पाटील यांच्यापासून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या पहिल्यांदाच निवडणुकीत उतरल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन मुळे काम पाहत आहेत.

बिनविरोधसाठी वाट पाहावी लागणार!

आज अर्जांची छाननी सुरू झाल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती भागवत शिंदे यांनी उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर पाच हरकती घेतल्या. यामध्ये थिटे यांच्या अर्जात नमूद केलेला मतदारयादीतील प्रभाग क्रमांक चुकीचा होता, मतदारयादीतील अनुक्रमांक चुकीचा होता, थिटे यांनी वयाचा पुरावा दिला नव्हता, सूचकाचा मतदारयादीतील अनुक्रमांक चुकीचा होता. यामध्ये या अर्जावर सूचकाची सही नसल्याची मुख्य हरकत होती. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1966 आणि नगरपंचायत अधिनियमानुसार सूचकाची सही बंधनकारक आहे. यामुळे त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, या ठिकाणी अपक्ष सरस्वती शिंदे यांचा अर्ज मंजूर झाल्याने पाटील परिवारातील पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविण्यासाठी सरसावलेल्या प्राजक्ता पाटील यांना उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात असं काय होतं ज्यामुळे वाढतात रक्तदाबाचे रुग्ण, कोणी आणि कशी  घ्यावी काळजी? घ्या जाणून हिवाळ्यात असं काय होतं ज्यामुळे वाढतात रक्तदाबाचे रुग्ण, कोणी आणि कशी घ्यावी काळजी? घ्या जाणून
आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांचं स्वतःच्या आरोग्यावर जराही लक्ष नसतं… कामाचा ताण, इतर तणाव अनेक गोष्टींमुळे व्यक्ती सतत चिंतेत असतो. एवढंच...
राजापूर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी मजबूत, कॉंग्रेसच्या हुस्नबानू खलिफे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात
भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी
मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक
Ramdev Baba: केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
हिंदुस्थानवर हल्ला करू असा इशारा दिलेला, आमच्या सैनिकांनी ते केलं; दिल्ली स्फोटात सामील असल्याची पाकिस्तानची कबुली
नितीश कुमार 10 व्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, गुरुवारी होणार शपथविधी सोहळा