उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद
राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीत आज नवीनच ट्विस्ट आला आहे. पोलीस बंदोबस्तात सोमवारी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिपृत उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज सूचकाची सही नसल्याने छाननीमध्ये नामंजूर करण्यात आला आहे.
उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती भागवत शिंदे यांनी उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर पाच हरकती घेतल्या. यामध्ये थिटे यांच्या अर्जात नमूद केलेला मतदारयादीतील प्रभाग क्रमांक चुकीचा होता, मतदारयादीतील अनुक्रमांक चुकीचा होता, थिटे यांनी वयाचा पुरावा दिला नव्हता, सूचकाचा मतदारयादीतील अनुक्रमांक चुकीचा होता. यामध्ये या अर्जावर सूचकाची सही नसल्याची मुख्य हरकत होती. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1966 आणि नगरपंचायत अधिनियमानुसार सूचकाची सही बंधनकारक आहे. यामुळे त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List