पश्चिम रेल्वे विस्कळीत; घरी परतणाऱ्या नोकरदारांची गैरसोय
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवेचे वेळापत्रक मंगळवारी सायंकाळी विस्कळीत झाले होते. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या तसेच डाऊन मार्गावरील लोकल ट्रेन जवळपास 10 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांची गैरसोय झाली. गाडय़ा उशिराने धावल्यामुळे प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली. मंगळवारी सकाळच्या पीक अवर्सला वेळेवर धावलेली लोकलसेवा दुपारनंतर विस्कळीत झाली. चर्चगेट व बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या आणि जलद मार्गावरील लोकल ट्रेन 10 ते 20 मिनिटे उशिराने धावल्यामुळे प्रवाशांची धावाधाव झाली. अंधेरी, वांद्रे, दादर या प्रमुख स्थानकांच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. लोकल सेवा विस्कळीत होण्यामागील नेमके कारण पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List