ठाण्यात घरकाम करणाऱ्या महिलांवर नराधमाचा अत्याचार
वर्तकनगर येथील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या कोरस नक्षत्र टॉवर या इमारतीत राहणाऱ्या एका नराधमाने घरकाम करणाऱ्या महिलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरी काम करण्यासाठी येणाऱ्या महिलांना जबरदस्तीने स्पर्श करून त्यांना लज्जा वाटेल असे कृत्य करणाऱ्या नराधमावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला एका खासगी एजन्सीमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून केयर टेकर म्हणून काम करते. या एजन्सीने पीडित महिलेला ठाण्याच्या वर्तकनगर येथील कोरस टॉवरमध्ये राहणाऱ्या अनिल गर्ग यांच्याकडे घरकाम करण्यासाठी पाठवले. तसेच त्यांच्याकडे 24 तास राहण्याचेदेखील सांगितले. दरम्यान नराधम अनिल गर्ग याने पीडित महिलेशी जबरदस्ती करून शारीरिक तसेच मानसिक त्रास देत होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List