वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटय़ूटच्या चौकशीचे आदेश
ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटय़ूट म्हणजेच व्हीएसआय संस्थेला देण्यात येणाऱया अनुदानाचा मूळ उद्देशाप्रमाणे विनियोग होत आहे काय याबाबत आयुक्त (साखर) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करावी. तपासणी करून शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्री समितीने दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील साखर कारखान्याच्या आगामी ऊस गाळप हंगामाच्या नियोजनासंबंधी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत व्हीएसआयला देण्यात येणाऱया अनुदान मुद्दय़ावर चर्चा झाली. व्हीएसआय या संस्थेस मंत्री समितीच्या मान्यतेने प्रत्येक गाळप हंगामामधील प्रति टन गाळपावर एक रुपया याप्रमाणे निधी कपात करून दिला जातो.
साखर संशोधनासाठी शासन निर्णय दि. 17 जून 2009 प्रमाणे सन 2009-10 या वर्षापासून अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. सदरचे अनुदान उपलब्ध करून देण्याच्या मूळ उद्देशाप्रमाणे अनुदानाचा विनियोग होत आहे काय याबाबत आयुक्त (साखर) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी क़रण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List