मंत्री, आमदारांच्या घरात लखलखाट; शेतकरी काळोखात, आमदार रोहित पवार यांचा आरोप

मंत्री, आमदारांच्या घरात लखलखाट; शेतकरी काळोखात, आमदार रोहित पवार यांचा आरोप

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. सरकारमधील मंत्री, आमदार यांच्या घरात दिवाळीचा लखलखाट असला, तरी दारात दिवा लावण्याचीही शेतकऱ्याची परिस्थिती नाही, त्यामुळे त्याचं घर आज काळोखात आहे. त्यांच्या घरातील अंधार दूर करून जगण्यासाठी आशेचा किरण दिसावा, यासाठी शेतकऱ्यांचा कर्जाचा फास काढणे नितांत गरजेचे आहे. डोळ्यावर झापडं लावलेल्या आणि सत्तेच्या धुंदीत सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सद्बुद्धी यावी, ही तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना केल्याचेही पवार म्हणाले.

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी  काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वारकरी आघाडीच्या वतीने सोमवारी (दि.20) देहूगाव येथील जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणामध्ये आमदार पवार सहभागी झाले होते. वारकरी आघाडीचे प्रमुख ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, विकास लवांडे, रविकांत वर्षे, देहूच्या माजी सरपंच रत्नमाला करंडे उपोषणात सहभागी झाले होते.

आमदार पवार म्हणाले, श्री संत तुकाराम महाराजांनी स्वतः त्यांच्या वडिलांच्या सावकारीच्या नोंदी असलेल्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवून लोकांचे कर्ज माफ केले होते. शरद पवार यांनीही देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी दिवाळी साजरी करू शकत नाहीत.

पुण्यात गुंडगिरी वाढली

एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पक्षाला भाजप स्वतंत्र लढायला सांगणार आहे. तसा आदेश भाजपच्या श्रेष्ठींकडून आला आहे. 2029 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका या दोन्ही पक्षांना स्वतंत्र लढाव्या लागणार आहेत. दोन्ही पक्षांचे आमदार भाजपमध्ये जातील. लोक सरकारला कंटाळले आहेत. कमळाला चिखलात ठेवतील. सरकारमध्ये दादागिरी वाढली आहे. पुण्यात गुंडागिरी वाढली आहे. गुंड, ठेकेदार, पैसेवाल्यांचे सरकार आहे. गरिबांचे सरकार नाही. गुंडागर्दी, भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे राज्यात गुंडागर्दीत, भ्रष्टाचारात एक नंबरवर अशी ओळख झाली आहे. नवीन शिल्पकारांनी पुण्याची ओळख बदलल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला.

लक्ष विचलित करण्यासाठी शनिवारवाड्याचा मुद्दा

जैन समाज ट्रस्टची पाच हजार कोटींची जागा सत्तेतील लोक हडप करायला निघाले आहेत. जैन बोर्डिंग प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत असून, राज्यातील एका मोठ्या मंत्र्याचे नातेवाईकही यात भागीदार आहेत. सरकार पैसे खाण्यासाठी मंदिर हटवत असेल तर दुर्दैवी आहे. जैन मंदिरावरील लक्ष विचलित करण्यासाठी शनिवारवाड्याचा मुद्दा भाजपने पुढे काढला आहे. ही जमीन जैन समाजाकडेच राहिली पाहिजे, अशी मागणीही पवार यांनी केली.

शिरसाट यांचा अहंकार जनता उतरवेल

मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोत पाच हजार कोटींचा गैरव्यहार केला. कर्जमाफीसाठी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्याला रुग्णवाहिकेतून घरी बोलाविले. घरी उपोषण सोडविले. मंत्र्यांचा हा अहंकार जनता उतरवेल. सिरसाट यांनी दिवस मोजावेत, पुढच्या काही दिवसांसाठीच मंत्री असणार आहेत. सिडको प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. बारा ‘ हजार पानांचे पुरावे मी दिले आहेत, असे पवार म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मासिक पाळीपूर्वी होतोय हिरवा रक्तस्त्राव? व्हा सावध, डॉक्टरांकडून जाणून घ्या कारण मासिक पाळीपूर्वी होतोय हिरवा रक्तस्त्राव? व्हा सावध, डॉक्टरांकडून जाणून घ्या कारण
स्त्रीच्या मासिक पाळीच्या चक्रावर जीवनशैली, अन्न, झोप आणि इतर अनेक घटकांचा प्रभाव असतो. मासिक पाळी ठरलेल्या वेळेत येणं देखील फार...
कामोठ्यात इमारतीला भीषण आग, आई व मुलीचा होरपळून मृत्यू
शेअर बाजारात मूहूर्त ट्रेडिंगचा उत्साह; सेन्सेक्स, निफ्टी उच्चांक गाठणार?
H-1B Visa Row – हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना दिलासा; व्हिसा शुल्कातील सूट देण्याबाबत महत्त्वाची माहिती
सोसायट्यांच्या आवारातूनच आता करणार कचरा संकलन; विमाननगर, भवानी पेठेत यशस्वी प्रयोग
चंद्रपुरात बंदूक, जिवंत काडतूस, खंजीर जप्त; चार आरोपींना अटक
मंत्री, आमदारांच्या घरात लखलखाट; शेतकरी काळोखात, आमदार रोहित पवार यांचा आरोप