आठ हजार शाळांमध्ये विद्यार्थी नाही तरीही 20 हजार शिक्षकांची नियुक्ती

आठ हजार शाळांमध्ये विद्यार्थी नाही तरीही 20 हजार शिक्षकांची नियुक्ती

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात देशातील सुमारे आठ हजार शाळांमध्ये एकही नवे अॅडमिशन झालेले नाही. मात्र या शाळांमध्ये एपूण 20 हजार 817 सरकारी शिक्षक नियुक्त आहेत. अशा शाळा पश्चिम बंगाल आणि तेलंगणामध्ये सर्वाधिक आहेत. पश्चिम बंगालमध्ये  3 हजार 812 शाळा, तर तेलंगणामध्ये 2245 शाळा शून्य पटसंख्येच्या आहेत. शून्य पटसंख्येच्या या शाळांमध्ये शिक्षकांच्या सर्वाधिक नियुक्त्या पश्चिम बंगालमध्ये केल्या गेल्या. त्या पाठोपाठ तेलंगणाचा क्रमांक लागतो. तब्बल 17905 शिक्षक एकटय़ा पश्चिम बंगालमधील शून्य पटसंख्येच्या शाळांमध्ये आहेत.

शून्य पटसंख्येची एकही शाळा नसलेली राज्ये

हरयाणा, महाराष्ट्र, गोवा, आसाम, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा.

शून्य पटसंख्येची एकही शाळा नसलेले केंद्रशासित प्रदेश

दिल्ली, पुदुच्चेरी, लक्षद्वीप, दादर आणि नगर हवेली, अंदमान-निकोबार बेटे, दमण आणि दीव, चंडिगड.

एक शिक्षकी शाळांची संख्याही मोठी

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील एक शिक्षकी शाळांची संख्या एक लाखांहून अधिक असून त्यामध्ये 33 लाखांवर विद्यार्थी शिकत आहेत.

एक शिक्षकी शाळांची सर्वाधिक संख्या आंध्र प्रदेशात आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, लक्षद्वीप, झारखंड, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यांचा क्रमांक लागतो.

2022-23 या वर्षात देशातील एक शिक्षकी शाळांची संख्या 1,18,190 होती. ती त्यापुढील वर्षात 1,10,971 पर्यंत कमी झाली.

2024-25 शैक्षणिक वर्षातील शून्य पटसंख्येच्या शाळा – 7993

या शाळांमध्ये नेमण्यात आलेले शिक्षक – 20,817

2023-24 या शैक्षणिक वर्षातील शून्य पटसंख्येच्या शाळा – 12,954

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;