स्टेशनवरील नाश्ता पडला १२ हजाराला, तरुणीचा मोबाईल चोरीला
रेल्वे स्थानकावर नाश्ता करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. फलाटावरील बाकड्यावर ठेवलेला १२ हजारांचा मोबाईल चोरीला गेला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
दिव्यात राहणारी 20 वर्षीय तरुणी नवी मुंबईहून मित्रासह कामावरून निघाली. ती आणि तिचा मित्र दोघेजण ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 3 वरील लेडीज डब्यासमोरील बाकड्यावर बसून नाश्ता करत होते. त्यानंतर ते तिकीट काढण्यासाठी बुकिंग काऊंटरवर गेले. तेथून निघाल्यानंतर खिशात मोबाईल नसल्याचे लक्षात आले. ते दोघेजण पुन्हा नाश्ता केलेल्या ठिकाणी गेले. मात्र बाकड्यावर मोबाईल नव्हता. अखेर तिने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याची तक्रार दिली. याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List