पदाचा वापर करून आपल्या कर्तृत्वशून्य मुलाला… संजय राऊत यांचा अमित शहांना जबरदस्त टोला

पदाचा वापर करून आपल्या कर्तृत्वशून्य मुलाला… संजय राऊत यांचा अमित शहांना जबरदस्त टोला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नेते,खासदार संजय राऊत यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. ”परिवारवाद हा फक्त राजकारणात नाही तर आपल्या पदाचा वापर करून कर्तृत्वशून्य मुलाला पदावर बसवणं त्यालाही परिवारवाद म्हणतात”, असा टोला त्यांनी अमित शहा व जय शहा यांना यांना लगावला.

”अमित शहा हे राजकारणात फार उशीरा आले. ते व्यापारी म्हणून राजकारण करत आहे. देशाशी, समाजाशी त्यांचा काही संबंध नाही. त्यांनी भाजपात एक व्यापारी वृत्तीची पिढी तयार केली. मुलाला क्रिकेटमध्ये टाकून त्यांनी क्रिकेट ताब्यात घेतलंय. परिवारवाद हा तिथून सुरू आहे. परिवारवाद फक्त राजकारणात नसतो. आपल्या पदाचा वापर करून कर्तृत्वशून्य मुलाला पदावर बसवणं त्यालाही परिवारवाद म्हणतात”, असे संजय राऊत म्हणाले.

अमित शहा यांनी मुंबई दौऱ्याच्या वेळी केलेल्या कुबड्याबाबत केलेल्या वक्तव्याचा देखील संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. ”फडणवीस अमित शहांच्या वक्तव्यावर सारवासारव का करत आहेत? अमित शहा स्पष्टपणे मित्रांना कुबड्या बोलले आहेत. या अपमानानंतर अजित पवार आणि शिंद्यांनी सरकारमधून बाहेर पडायला हवं. स्वाभिमानाची थोडी तरी ठिणगी पेटत असेल तर काल अमित शहांनी त्यांचा जो काही कुबड्या असा उल्लेख केला त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला हवं, असेही संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले की, या देशात लोकशाही आहे. एक वेळ अशी होती की भाजपला दुर्बिनीतून शोधावा लागत होतं आमच्या सारख्या लोकांनी भाजपचं अस्तित्व निर्माण केलं. एक वेळ अशीही येईल की भाजप दुर्बिनीतूनच काय लोकांच्या नजरेलाही पडणार नाही. हे भाकित नाही. सत्य आहे. राजकारणात चढ उतार होत असतात. अशी भाषा वापरणारे या देशाच्या मातीतच गाडले गेले आहेत, असा इशाराही त्यांनी अमित शहांना दिला.

भाजपकडे पोस्टर लावायलाही माणसं नव्हती

”महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुकीत यांच्याकडे पोस्टर लावायला यांच्याकडे माणसं नव्हती. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसैनिकांना आदेश दिले की भाजपचंही काम केलं पाहिजे. कुबड्या कुबड्या काय सांगता? बाबरीनंतर आम्ही देशभरात निवडणूका लढणार होतो. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, बिहार अशा 65 ठिकाणी निवडणुका लढणार होतो. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची देशभरात लाट होती. त्यावेळी अटलजी व आडवाणीजी यांनी बाळासाहेबांना विनंती केली की तुम्ही निवडणुका लढल्या तर हिंदुत्वात फूट पडेल, भाजपचं नुकसान होईल. तेव्हा बाळासाहेबांनी आम्हाला माघार घ्यायला लावली नाहीतर त्यांना कुबड्या काय असतं ते कळलं असतं”, असे संजय राऊत म्हणाले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कॅच पकडताना क्रिकेटर श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यानंतर त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंतर्गत...
हिवाळ्यात ‘हा’ एक पदार्थ खा आणि अनेक आजारांपासून आराम मिळवा… डॉक्टरकडे जावं लागणार नाही!
बिहार निवडणुकीपूर्वी RJD ने घेतला मोठा निर्णय, 27 गद्दारांची पक्षातून हकालपट्टी
Photo – पुण्याच्या ‘बीबी रेसिंग’ने पहिली फेरी गाजवली
अमित शहांना म्हटले लोहपुरुष, वल्लभभाई पटेलांसोबत केली तुलना; काँग्रेसने भाजपला फटकारले
LOC वर पाकिस्तानकडून फायरिंग, हिंदुस्थानने दिले चोख प्रत्युत्तर
खासगी बसचा हाय टेन्शन वायरला स्पर्श, भीषण आगीत तिघांचा होरपळून मृत्यू तर 12 जण जखमी