अतिवृष्टीसाठी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही, मंत्र्यांनी दाखवला आरसा; वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा

अतिवृष्टीसाठी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही, मंत्र्यांनी दाखवला आरसा; वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली म्हणून पाठ थोपटून घेतलेल्या महायुती सरकारला त्यांच्याच मंत्र्यांनी आरसा दाखवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनीच शेतकऱ्यांना मदत पोहचली नसल्याचे सांगितले. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये यावरून वाद झाल्याचे वृत्त आहे. शेतकऱ्यांना मदत पोहोचली नाही हे आम्ही दिवाळीत सांगत होतो. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली, राज्यातील बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. पण महायुती सरकारमध्ये निवडणुका, एकमेकांचे पाय ओढणे यापलिकडे कोणाला काही पडलेलं नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही म्हणून एकमेकांकडे बोट दाखवत आहे, अशी जबाबदारी झटकून उपयोग नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीला हे सरकार जबाबदार आहे, त्यांना लवकरात लवकर मदत करा, त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असेही विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला सुनावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Red Wine Myths: रेड वाइन खरंच शरीरासाठी चांगली असते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून Red Wine Myths: रेड वाइन खरंच शरीरासाठी चांगली असते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
वाइन पिणारे अनेकदा सांगतात, रेड वाइन आरोग्यासाठी फायदेशीर आणि हृदयासाठी चांगली आहे. म्हणून थोडी-थोडी रोज प्यावी. वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड...
Ratnagiri News – “बिन खुर्चीचा डॉक्टर” म्हणून ओळख असलेल्या डॉ. मधूकर लुकतुके यांचे निधन
मतांची चोरी करुन सत्तेत आलेले देवेंद्र फडणवीस हे चिप मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ
Mumbai News – दिवाळीचा गृहपाठ पूर्ण केला नाही, आठवीच्या विद्यार्थिनीला ट्युशन टीचरकडून बेदम मारहाण
Ratnagiri News – आंजर्लेतील कड्यावरच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
महाराष्ट्रात हजारो मतांचा घोळ पुराव्यांसह निदर्शनास येतोय, निवडणूक आयोग झोपलंय का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
Photo – ‘मोंथा’ चक्रीवादळाचा प्रभाव, मुंबईत दादर समुद्रकिनारी धोक्याचा लाल बावटा