Ratnagiri News – “बिन खुर्चीचा डॉक्टर” म्हणून ओळख असलेल्या डॉ. मधूकर लुकतुके यांचे निधन
“बिन खुर्चीचा डॉक्टर” म्हणून दापोली तालुक्यात डॉ. मधुकर लुकतुके यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांचे आज (28 ऑक्टोबर 2025) वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. डॉ.मधुकर लुकतुके यांनी त्यांच्या दवाखान्यात सेवा बजावताना कधीही टेबल-खुर्ची वापरली नाही. ते रूग्णांना उभं राहून तपासत असतं. म्हणून त्यांना आदराने “बिन खुर्चीचा डॉक्टर” असे म्हणत असतं. त्यांच्या दवाखान्याबाहेर रूग्णांची गर्दी असायची. डॉ.मधुकर लुकतुके यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी दाभोळ गावात रूग्णसेवा केली.
दापोली तालुक्यातील दाभोळ या दुर्गम गावात डॉ.मधूकर लुकतुके सेवा बजावत होते. डॉ.लुकतुके यांचा जन्म १९३५ साली कोल्हापूरातील आजरा येथे झाला. त्यांनी मुंबईच्या जी.एस.मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. १९६० साली वैद्यकीय अधिकारी म्हणून ते दाभोळ गावात पोहचले. त्याकाळी दाभोळ गावात वीज नव्हती, रस्ते नव्हते. गावात गरीबी होती. अंधश्रध्दा होती. लोक अशिक्षित होते. अशा परिस्थितीत त्यांनी दाभोळ गावात वैद्यकीय सेवा दिली. वैद्यकीय अधिकारी पदावरून त्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर शहरात न जाता त्यांनी दाभोळ गावातच सेवा बजावली. त्यांच्या दवाखान्यात त्यांनी टेबल-खुर्ची ठेवली नव्हती. ते उभं राहूनच रूग्णांना तपासत असतं. म्हणून लोक आदराने त्यांना “बिन खुर्चीचा डॉक्टर” म्हणत होते. गेले काही दिवस ते आजारी होते आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी आठवणींना उजाळा दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List