प्रशांत किशोर यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस; बिहार-बंगाल मतदार यादीत नाव, ३ दिवसांत मागितले उत्तर
जनसुराज पार्टीचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांना आज निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. दोन मतदार ओळखपत्रे असल्याबद्दल आयोगाने किशोर यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. किशोर यांचे नाव पश्चिम बंगाल आणि बिहार या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत आहे. निवडणूक आयोगाने त्यांना तीन दिवसांत त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. रोहतास जिल्ह्यातील कारगहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी आणि पोलीस उपायुक्त सासाराम यांनी मंगळवारी ही नोटीस बजावली.
नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार, प्रशांत किशोर यांचे नाव बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत आहे. ते बिहारमधील कारगहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत आहेत आणि ते पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघाचे मतदार देखील आहेत.
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदारसंघात नोंदणी करता येत नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास एक वर्षापर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रशांत किशोर यांना तीन दिवसांच्या आत आयोगाला त्यांचे उत्तर मांडण्यास करण्यास सांगितले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List