अमित शहांना म्हटले लोहपुरुष, वल्लभभाई पटेलांसोबत केली तुलना; काँग्रेसने भाजपला फटकारले
भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मुंबईत झाले. यावेळी मुंबई भाजपकडून शहा यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंगवर अमित शहा यांचा उल्लेख देशाचे लोहपुरुष असा करण्यात आला होता. त्यावरून काँग्रेसने भाजपला फटकारले आहे.
कोणाशी तुलना करता @AmeetSatam? सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी? इतका निलाजरेपणा बरा नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांना जनतेने लोहपुरुष ही उपाधी दिली होती आणि कणखर गृहमंत्री म्हणून त्यांची गणना केली होती. त्यांच्या “कणभर” तरी हे आहेत का? pic.twitter.com/vBzRDbrpDr
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 28, 2025
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्या पोस्टरचा एक फोटो शेअर करत ट्विट केले आहे. ”कोणाशी तुलना करता? सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी? इतका निलाजरेपणा बरा नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांना जनतेने लोहपुरुष ही उपाधी दिली होती आणि कणखर गृहमंत्री म्हणून त्यांची गणना केली होती. त्यांच्या “कणभर” तरी हे आहेत का? असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List