‘डिजिटल अरेस्ट’ करून श्रीरामपुरातील डॉक्टरला सात कोटींचा गंडा

‘डिजिटल अरेस्ट’ करून श्रीरामपुरातील डॉक्टरला सात कोटींचा गंडा

सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांकडून तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रुपये लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हेगारांनी सर्वोच्च न्यायालय, ईडी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून डॉक्टरांना भीती घालत वेळोवेळी त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम हस्तांतरित करून घेतली.

याप्रकरणी डॉक्टरांनी सोमवारी (दि. 13) येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, विविध मोबाईल क्रमांक व खातेदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

डॉक्टरांना 7 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सऍप व्हिडीओ कॉल येत होते. एका कॉलमध्ये डॉक्टरांना एक नंबर पाठवून हा तुमचा नंबर आहे का, अशी चौकशी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांवर अवैध जाहिरात, अश्लिलता आणि त्रास देणे (हरॅशमेंट) यासंबंधी प्रकरण दाखल असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आरोपींनी स्वतःला पोलीस अधिकारी देविलाल सिंग आणि न्यायाधीश म्हणून सादर करत, ‘तुम्हाला डिजिटल अरेस्ट केले आहे’, असे सांगून डॉक्टरांना घरात नजरकैदेत असल्याची भीती दाखवली. त्यांनी डॉक्टरांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असल्याचेही सांगितले.

संशयितांनी डॉक्टरांना ‘तुमच्या खात्यात काळा पैसा आला आहे, त्यामुळे तुम्हाला अटक होऊ शकते, तुमच्या मुलांचे करिअर नष्ट होईल,’ अशा धमक्या दिल्या. तसेच सर्वोच्च न्यायालय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या नावाने बनावट नोटिसा, आदेश आणि ओळखपत्रे पाठवली. या दबावाखाली डॉक्टरांनी वेळोवेळी 7 कोटी 17 लाख 25 हजार रुपये विविध खात्यांमध्ये वर्ग केले.

डॉक्टरांना अखेर संशय आल्याने त्यांनी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध मोबाईल नंबरधारक आणि बँक खातेधारक अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;