सोने एका दिवसात 2000 रुपयांनी घसरले, चांदीच्या दरातही मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर…

सोने एका दिवसात 2000 रुपयांनी घसरले, चांदीच्या दरातही मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर…

दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण अजूनही सुरुच आहे. सोने आणि चांदीचे दर मंगळवारीही घसरले आहेत. जागितक शांततेसाठी होत असलेले प्रयत्न आणि टॅरिफबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले सकारात्मक संकेत यामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११९,००० पर्यंत घसरली आहे. तर चांदीच्या किमतीही मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत.

सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घट दिसत आहे. २३ कॅरेट सोन्याचे दर १२०५९३ रुपयांवरून ११८६८७ रुपयांवर आले आहेत. सोने एका दिवसात १,९०६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. २२ कॅरेट सोने ११०९०७ रुपयांवरून १०९१५४ रुपयांवर आले आहे. ते एका दिवसात १,७५३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. १८ कॅरेट सोने ९०८०९ रुपयांवरून ८९३७३ रुपयांवर आले आहे. ते १,४३६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर 14 कॅरेट सोने ७०८३१ रुपयांवरून ६९७११ रुपयांवर झाले आहे. ते एका दिवसात १,१२० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोन्याप्रमाणे चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. एक किलो चांदीसाठी १४५०३१ रुपये मोजावे लागत आहेत. दिवाळीपूर्वी चांदीचे दर एक किलोसाठी 2 लाखांपर्यंत पोहचले होते. सराफा बाजाराप्रमाणे वायदे बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसत आहे. चांदी प्रति १ किलोसाठी १४५०३१ रुपयांवरून १४३४०० रुपयांवर आले आहेत. ते एका दिवसात १,६३१ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;