Red Wine Myths: रेड वाइन खरंच शरीरासाठी चांगली असते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
वाइन पिणारे अनेकदा सांगतात, रेड वाइन आरोग्यासाठी फायदेशीर आणि हृदयासाठी चांगली आहे. म्हणून थोडी-थोडी रोज प्यावी. वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड सांगतात, असा दावा केला जातो की रेड वाइनमध्ये रेस्वेराट्रॉल (Resveratrol) असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतं, पण रेस्वेराट्रॉलची पूर्तता करण्यासाठी रेड वाइन हा एकमेव पर्याय नाही. (फोटो: Unsplash)
वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड सांगतात, रेस्वेराट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, पण त्याची पूर्तता करण्यासाठी रेड वाइन पिणं योग्य नाही. आहारात बेरी, द्राक्षं आणि शेंगदाणे समाविष्ट करून रेस्वेराट्रॉल मिळवता येऊ शकतं. अल्कोहोल कधीच आरोग्यदायी टॉनिक किंवा पेय सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून मर्यादित प्रमाणात घेणंच उत्तम आहे, याला कायमस्वरूपी पर्याय बनवू नका. (फोटो: Unsplash)
एक सामान्य समज असतो की शॅम्पेन फक्त पार्टीसाठी असते, पण तसं नाही. अशा स्पार्कलिंग वाइनचा वापर फक्त पार्टीपुरता मर्यादित नसतो. वाइन तज्ज्ञ सांगतात, अल्कोहोलिक पेय कोणतंही असो, ते मर्यादित प्रमाणात पिणंच उत्तम असतं. (फोटो: Unsplash)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List