स्वस्तात प्लॉटच्या आमिषाने 15 लाखांची फसवणूक; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल

स्वस्तात प्लॉटच्या आमिषाने 15 लाखांची फसवणूक; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल

कमी किमतीत प्लॉट व जमीन घेऊन देण्याच्या आमिषाने अहिल्यानगरमधील औषध विक्रेत्याची 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कल्याण येथील बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिक आशीष उमाशंकर पांडे व त्याचे वडील उमाशंकर पांडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संदीप दत्तात्रय खरपुडे (रा. गोंधळे गल्ली, माळीवाडा. हल्ली रा. एकदंत कॉलनी, औसरकर मळा, तारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी संदीप खरपुडे यांचे मेडिकल दुकान आहे. त्यांचे मित्र स्वप्नील लाहोर यांच्यामार्फत त्यांची कल्याण येथील बांधकाम व्यावसायिक आशीष उमाशंकर पांडे याच्याशी ओळख झाली होती. सन 2021 मध्ये स्वप्नील लाहोर याने फिर्यादीला सांगितले की, आशीष पांडे हा कमी किमतीत प्लॉट व जमीन घेऊन देतो. त्यामुळे फिर्यादीने त्याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने वेगवेगळ्या जमिनी दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

आशीष पांडे याने जमीन खरेदीसाठी 15 लाख रुपये मागितले. त्याच्यावर विश्वास ठेवून खरपुडे यांनी त्याच्या बँक खात्यावर 5 लाख व त्याचे वडील उमाशंकर पांडे यांच्या बँक खात्यावर 5 लाख तसेच 22 जानेवारी रोजी पुन्हा 5 लाख, असे 15 लाख रुपये आरटीजीएसद्वारे पाठविले. त्यावेळी त्याने 15 दिवसांत तुम्हाला प्लॉट व जमिनीची खरेदी देतो, असे सांगितले. 15 दिवसांनी फिर्यादीने त्याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी फिर्यादीकडे पैसे नसल्याने त्याने नकार दिला.

काही दिवसांनी फिर्यादीने आशीष पांडे यास पैशांची मागणी केल्यावर तो आज देतो, उद्या देतो, असे सांगून टाळाटाळ करू लागला. गेल्या 4 वर्षांत फिर्यादीने आशीष पांडेकडे अनेकदा पैशांची मागणी केली. मात्र, त्याने पैसे दिले नाहीत आणि प्लॉट किंवा जमीनही खरेदी करून दिली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर खरपुडे यांनी 14 ऑक्टोबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;