बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या
हिंदू धर्मात अन्नाला देवाचे रूप मानले जाते. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हटलं जातं. त्याला पाय लागला किंवा एखादा भाताचा कण देखीला पायाखाली आला तरी आपण त्याच्या पाया पडतो. आपण अन्नाला पुजतो. म्हणूनच अन्नाला सूर्यदेवासारखे पवित्र मानले जाते. अन्न हे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करते, शक्ती देते त्यामुळे त्याला शक्तीचे रुपही मानले जातात. त्यामुळे ताटात घेतलेले अन्नही आपण वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न करतो. ताटात उष्ट राहू नये असेही म्हटले जाते.
अनेकांच्या घरी अजूनही जेवायला बसल्यानंतर हात जोडून आधी प्रार्थना केली जाते. मग जेवायला सुरुवात केली जाते. पण अनेकांच्या घरी घरात चप्पल वापरतात, आणि जेवायलाही तसेच बसतात. तसेच अनेकदा बाहेर असल्यावर, किंवा रेस्टारंटमध्ये गेल्यावर आपल्याला पायात चप्पल किंवा बूट घालूनच जेवावे लागते मग बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? याची वैज्ञानिक आणि धार्मिक दोन्ही कारणे जाणून घेऊयात.
वैज्ञानिक कारणे
शूज आणि चप्पल बहुतेकदा विविध प्रकारच्या घाण, चिखलाने, धुळीने माखलेले असतात. जर तुम्ही तसेच जेवायला बसले तर यामुळे तुमच्या अन्नात बॅक्टेरिया येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. म्हणून, शूज आणि चप्पल घालून खाणे ही चांगली कल्पना नाही, आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते अजिबात चांगले मानले जात नाही.
धार्मिक कारणे
हिंदू धर्मात, अन्न आणि अग्नि दोन्ही अत्यंत पवित्र मानले जातात आणि म्हणूनच, ते स्वयंपाकघरात एकमेकांशी संबंधित असतात. कारण दोन्ही मानवी भूक भागवतात. अशाप्रकारे, हिंदू संस्कृतीत स्वयंपाकघर हे एक पवित्र स्थान आहे. म्हणूनच, बूट किंवा चप्पल घालून जेवण करणे पाप मानले जाते आणि देवी अन्नपूर्णेचा अपमान मानला जातो. त्यामुळे स्वयंपाकघरातही बूट किंवा चप्पल घालून जाऊ नये.
कसे जेवावे?
जेवण्यापूर्वी तुम्ही हातपाय स्वच्छ धुवावेत आणि बसून जेवावे. कधीही अंथरुणावर बसून जेवू नये. यामुळे देवी अन्नपूर्णा आणि धनाची देवीचा, खाणाऱ्या अन्नाचा तो अपमान मानला जातो. ज्यामुळे जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून, जेवण्यापूर्वी दररोज तुमचे बूट आणि चप्पल लांब किंवा घराबाहेर काढून ठेवणे चांगले. हे तुम्हाला आजारांपासून देखील वाचवेल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List