ट्रम्पचा कॅनडावर पुन्हा टॅरिफ बॉम्ब, टीव्हीवरील जाहिरातीने संताप
टीव्हीवरील एका जाहिरातीमुळे संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लादला आहे. हिंदुस्थाननंतर कॅनडा हा एकमेव असा देश आहे ज्याच्यावर ट्रम्प यांनी अतिरिक्त टॅरिफ लावला आहे.
याआधी ट्रम्प यांनी कॅनडावर 35 टक्के टॅरिफ लादला होता. नव्याने दहा टक्के आकारणी केल्याने कॅनडाला 45 टक्क्यांचा फटका बसणार आहे. ही वादग्रस्त जाहिरात तत्काळ काढण्याचे आवाहन ट्रम्प यांनी कॅनडाला केले होते. तरीदेखील ही जाहिरात विश्व मालिकेत झळकली. याच रागात ट्रम्प यांनी अतिरिक्त दहा टक्के टॅरिफचा झटका कॅनडाला दिला.
माजी राष्ट्राध्यक्षाच्या वक्तव्याने खळबळ
कॅनडाच्या ओंटारियाने राज्याने ही जाहिरात बनवली आहे. या जाहिरातीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे शब्द वापरण्यात आले होते. टॅरिफमुळे व्यापार युद्ध व आर्थिक संकट येऊ शकते. प्रत्येक अमेरिकन नागरिकासाठी टॅरिफ हानिकारक आहे, असे वक्तव्य रेगन यांनी केले होते. हा सर्व भाग या जाहिरातीत वापरण्यात आला होता. यावर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List