पायांच्याबाबतीत तुम्हालाही दिसली ही 3 लक्षणे तर समजून जा शरीरात काहीतरी बिघडलं आहे; ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बऱ्याचदा आपण आपल्या शरीराने दिलेल्या संकेतांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो. पण वारंवार तशा पद्धतीचे संकेत आपल्याला मिळत असतील तर समजून जा की काहतरी गडबड आहे. काही लक्षणांना दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. असेच एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे रक्ताभिसरण बिघडणे. त्याबद्दलची लक्षणे म्हणजे पायांवर दिसतात. जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये काही वेगळी लक्षणे जाणवत असतील तर समजून घ्या की तुमच्या शरीरात रक्ताभिसरण योग्यरित्या होत नाही. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. जाणून घेऊयात की ते तीन लक्षणे कोणती जी वेळीच ओळखून उपचार केले नाही तर त्याचे परिणाम आपल्याच शरीरावर होतील.
पायांच्याबाबत जाणवणारी लक्षणे
पायांमध्ये सूज आणि जडपणा जाणवणे
जर तुम्हाला तुमच्या पायावर आणि घोट्यांना सूज येत असेल, विशेषतः संध्याकाळी किंवा बराच वेळ उभे राहिल्यानंतर, तर समजून जा ते रक्ताभिसरण बिघडल्याचे लक्षण आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘एडिमा’ म्हणतात. खराब रक्ताभिसरणामुळे पायांमध्ये रक्त आणि इतर द्रव जमा होतात. ज्यामुळे ते जड आणि सुजलेले वाटतात. कधीकधी घातलेले बूट पायांना खूप घट्ट होत असतात त्यामुळे देखील रक्ताभिसरण नीट होत नाही.
पाय दुखणे, पेटके येणे किंवा सुन्न होणे
चालताना किंवा झोपताना रोज पाय दुखतात का? तुम्हाला कधीकधी पायांमध्ये पेटके किंवा सुन्नपणा येतो का? ही सर्व रक्ताभिसरण बिघडल्याची लक्षणे असू शकतात. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताभिसरण मंदावते तेव्हा स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळत नाहीत, ज्यामुळे पायांत वेदना आणि पेटके येतात. कधीकधी तुम्हाला तुमच्या पायांमध्ये मुंग्या येणे देखील जाणवू शकते. जर तुम्हाला चालताना पाय दुखत असतील आणि तुम्ही थांबल्यावर ते कमी होत असेल, तर याला क्लॉडिकेशन म्हणतात, जे रक्ताभिसरण बिघडल्याचे एक सामान्य लक्षण आहे.
पायांच्या रंगात किंवा तापमानात बदल आणि जखमा बऱ्या होण्याची प्रक्रिया मंदावणे.
तुमच्या पायांचा रंग आणि तापमानाकडेही लक्ष द्या. जर तुमचे पायांचे तळवे वारंवार थंड पडत असतील. विशेषतः तुमच्या पायाची बोटे, तर हे रक्ताभिसरण बिघडल्याचे लक्षण असू शकते. खराब रक्ताभिसरणामुळे तुमच्या पायांपर्यंत पुरेशी उष्णता पोहोचू शकत नाही. तसेच काहीवेळेला पायाचा रंगही बदलू शकतो. कधीकधी ते निळे किंवा जांभळे दिसू शकतात किंवा अगदी लाल देखील होऊ शकतात. जर तुमच्या पायावर एक लहानसा कट किंवा जखम असेल जी नेहमीपेक्षा बरी होण्यास जास्त वेळ लागत असेल, तर हे देखील खराब रक्ताभिसरणाचे लक्षण असू शकते. जखम बरी होण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळत नसल्याने असे होते.
ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या
जर तुम्हाला यांपैकी कोणतीही लक्षणे सतत जाणवत असतील तर मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, तपासणी करून घ्या अन्यथा पुढे जाऊन त्रास होणार नाही. खराब रक्ताभिसरणाकडे दुर्लक्ष केल्याने हृदयरोग, स्ट्रोक किंवा गॅंग्रीन सारखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List