भाजपच्या बॅनरवर अमित शहा लोहपुरुष ! रोहीत पवार यांनी केली टीका

भाजपच्या बॅनरवर अमित शहा लोहपुरुष ! रोहीत पवार यांनी केली टीका

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच त्यांच्या स्वागताचे जागोजागी होर्डिंग लागले आहेत. या होर्डिंगवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिल्याने जनतेने सरदार पटेल यांना आदराने #लोहपुरूष ही उपाधी दिली. कार्यकर्त्यांच्या भावना समजू शकतो मात्र महापुरुषांचा अशा प्रकारे अवमान करणं भाजपने टाळलं पाहिजे असा सल्लाही रोहित पवार यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर दिला आहे.

रोहित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे एक पोस्टर एक्सवर शेअर केले आहे. त्या पोस्टरमध्ये महाराष्ट्राचे लोहपुरुष अमित शहा असा उल्लेख केला आहे. हे पोस्टर पाहून रोहित पवार यांनी भाजपवर संताप व्यक्त करत त्यांना खोचक सल्लाही दिला आहे. रोहीत पवार यांनी आपल्या एक्सवर म्हटले आहे की, ”स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिल्याने जनतेने सरदार पटेल यांना आदराने #लोहपुरूष ही उपाधी दिली. जशी #राष्ट्रपिता ही उपाधी महात्मा गांधी सोडून कुणालाच शोभणार नाही तेच लोहपुरूष या उपाधीलाही लागू पडतं. कार्यकर्त्यांच्या भावना समजू शकतो मात्र महापुरुषांचा अशा प्रकारे अवमान करणं भाजपने टाळलं पाहिजे. कदाचित हा फ्लेक्स बघितल्यावर ते गृहमंत्री मा. अमित शाह साहेबांनाही आवडणार नाही”..असे म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;