लग्नाच्या 5 वर्षांनंतर पाळणा हलला, महिलेने एक-दोन नव्हे… ‘इतक्या’ बाळांना दिला जन्म
बिहार येथील मोतीहारी भागात एका विवाहितेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आई आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम आहे. या महिलेचा विवाह होऊन पाच वर्षे झाल्यानंतर तिची ही पहिलीच प्रसूती झाली आहे. या महिलेने एक मुलगा आणि तीन मुलींना जन्म दिला आहे.
बिहार राज्यातील मोतिहारी वात्सल्य नर्सिग होम एण्ड आयव्हीएफ सेंटर येथे एका महिलेने चार बाळांना जन्म दिला आहे. विसुनपुर ढेकहा येथे रहाणारे पप्पू कुमार चौधरी यांची पत्नी रंजू देवी यांनी सकाळी चार अपत्यांना जन्म दिला. यात तीन मुली आणि एक मुलगा आहे. यामुळे या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
मोतीहारी येथील हॉस्पिटल रोड स्थित वात्सल्य नर्सिंग होम एण्ड आयव्हीएफ सेंटरच्या डॉ.स्वास्तिक सिन्हा आणि डॉ.अनन्या सिन्हा यांच्या टीमने हे ऑपरेशन केले. डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन यशस्वी झाले असून आई आणि बाळांची तब्येत चांगली आहे.
रंजू देवी यांना लग्नाला सुमारे पाच वर्षे झाली आहेत. त्यांची ही पहिलीच प्रसुती आहे. चार मुलांना एकाच वेळी जन्म दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वात्सल्य नर्सिंग होम डॉक्टर अनन्या सिन्हा यांनी सांगितले की हे प्रकरण दुर्मिळ आहे. कारण एकाच वेळी इतक्या मुलांना जन्म देण्याची घटना कमी घडत असते.
सध्या या बाळांना डॉक्टरांच्या विशेष देखरेखी खाली ठेवले आहे. या बाळांची प्रकृती सामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अनोख्या बातमीमुळे या गावात आनंदाचे वातावरण आहे. आजुबाजूचे लोकही या दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. रंजू देवी आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा महत्वाचा दिवस ठरला आहे. एकाच वेळी चार बाळांना त्यांनी जन्म दिल्याने त्यांचे सर्वत कौतूक होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List