प्रार्थना बेहेरेवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचं अपघाती निधन

प्रार्थना बेहेरेवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचं अपघाती निधन

चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी ऑक्टोबर महिन्यात जगाचा निरोप घेतला. ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाची बातमी ताजी असतानाच मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रार्थनाच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वीच म्हणजे ऐन दिवाळाच्या तोंडावर 14 ऑक्टोबर रोजी रोड  अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. प्रार्थनाने वडिलांचा फोटो शेअर करताना एक भावुक कॅप्शन लिहिलयं. 14 ऑक्टोबर रोजी माझ्या बाबांचे एका रोड अपघातात दुर्दैवी निधन  झाले, असे तिने सांगितले.

“मर के भी किसी को याद आएंगे,
किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे
कहेगा फूल हर कली से बार बार
जीना इसी का नाम है “ ….!
“बाबा ……. तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय ,तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजतं, तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो, आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे, तर दृष्टिकोन असतो. तुमचा प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि लोकांप्रती असलेलं निस्सीम प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं.तुम्ही आम्हाला शिकवलंत की इतरांना मदत करणे हेच खरं समाधान आहे, असे तिने म्हटले आहे.

तुमची अचानक झालेली exit, मनाला भयंकर लागली

“आज तुम्ही आमच्यासोबत नसला तरी तुमचा आवाज आणि गाणी आम्हाला सतत बळ देतात. तुमची अचानक झालेली exit, मनाला भयंकर लागली आहे. काल परवा पर्यंत सगळ अलबेल होतं. तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खुप दुखावलो आहोत.

प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच रहाणार आहे.पण या सगळ्या घटनेला वेगळ्या दृष्टीने पाहीलं तर, तुम्ही अधिक प्रत्येकाच्या जवळ रहाणार आहात. कारण तुम्ही स्मरणात रहाणार. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी, आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा, तुमच्याशी संवाद साधू शकतोय.तुम्हाला आजपर्यंत अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी करत आली आहे. आता अधिक जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला माझ्या अप्रतिम कामाने श्रध्दांजली अर्पण करत रहाणं, हे माझं कर्तव्य आहे. डोळ्यातलं पाणी कधीच तुम्हाला दिसू नये याची काळजी घेईन. कारण मलाही तुम्हाला धूसर पहायचं नाही. तुमचं ओठावरचं हसू, मनात घर करून राहीलं आहे. तेच टिकवण्याची जबाबदारी मी घेणार आहे. काळजी करू नका… मी खुप strong आहे. कारण माझ्या पाठीशी नाही तर, तुम्ही सोबत आहात याची खात्री आहे. I LOVE YOU BABA , MISS YOU FOREVER…”, अशी भावुक पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे.

प्रार्थनाच्या या पोस्टवर अनेक कलाकरांनी तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहत, तिच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी आधार देत आहेत.

ऑक्टोबर महिन्यात चित्रपट सृष्टीला जणू ग्रहण आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या महिन्यात दिग्गज अभिनेते पंकज धीर, असरानी, सतीश शहा या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. यामुळे चित्रपट सृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ranji Trophy – पृथ्वी शॉचं वादळ, चंदीगडला तडाखा; 140 च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं द्विशतक Ranji Trophy – पृथ्वी शॉचं वादळ, चंदीगडला तडाखा; 140 च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं द्विशतक
टीम इंडियाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ याने रणजी करंडकात वादळी खेळी केली आहे. चंदीगडविरुद्ध पृथ्वी शॉ याने 140 च्या स्ट्राईक रेटने...
AI च्या माध्यमातून भावाचे आणि बहिणींचे बनवले अश्लिल फोटो आणि व्हिडीओ; ब्लॅकमेलिंगला कंटाळून 19 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
देशाची प्रतिमा मलिन होत आहे….भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
उत्तम आरोग्यासाठी रोज एक वाटी दही आहे खूप गरजेचे, वाचा
लग्नात सुंदर दिसण्यासाठी करून बघा हे खास फेशियल
वजन कमी करण्यासाठी या भाकरीचा आहारात समावेश करायलाच हवा, वाचा
फलटण प्रकरणात माजी खासदाराला CM कडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच! – हर्षवर्धन सपकाळ