लालपरीला भेट… माहेरवाशिणींनी दोन दिवसांत मिळवून दिले तीन कोटी

लालपरीला भेट… माहेरवाशिणींनी दोन दिवसांत मिळवून दिले तीन कोटी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील अकरा आगारांतील एसटी बसमधून भाऊबीज सणानिमित्ताने अनेक बहिणींनी प्रवास केला. त्यामुळे दोन दिवसांत 3 कोटी 34 लाख 79 हजार रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला.

सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव – खंडाळा, मेढा, फलटण, कोरेगाव, वडूज, दहीवडी या 11 आगारांतून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. तसेच महिला सन्मान योजनेमुळे एसटीकडे महिला प्रवाशांचा ओढा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. दिवाळी काळात 725 एसटी बसेसमधून जास्तीत जास्त प्रवासी वाहतुकीसाठी तत्कालीन विभाग नियंत्रक विकास माने यांच्यासह अन्य अधिकाऱयांनी नियोजन केले होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात सर्व आगारांतील बसेसमार्फत प्रवासी वाहतूक करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाऊबीज सणानिमित्त ग्रामीण आणि शहरी भागांतील महिलांचा माहेरी जाण्याचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून आला. दि.23 व 24 ऑक्टोबर रोजी बसस्थानक विशेषतः महिला प्रवाशांनी फुलून गेली होती.

दोन दिवसांतील एकूण उत्पन्न

दीपावली सणात भाऊबीज सणादिवशी दि. 23 ऑक्टोबर रोजी 1 कोटी 67 लाख 41 हजार रुपये, दि. 24 ऑक्टोबर रोजी 1 कोटी 67 लाख 38 हजार 286 रुपये असा मिळून 3 कोटी 34 लाख 79 हजार रुपयांचा महसूल सवलत मूल्यासह सातारा विभागाला मिळाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;