Crime news – अर्धवेळ नोकरीच्या नावाखाली महिलेची 12 लाखांची फसवणूक
अर्धवेळ नोकरीच्या नावाखाली ठगाने महिला व्यावसायिकाची बारा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
दादर येथे राहणाऱया तक्रारदार याची खासगी कंपनी आहे. गेल्या आठवडय़ात त्यांना एका नंबरवरून मोबाईलवर मेसेज आला होता. मेसेज करणाऱयाने ती एका कंपनीतून बोलत असल्याचे भासवले. त्या कंपनीत ती टीम लीडर म्हणून काम करते अशा भूलथापा मारल्या. त्याच्या कंपनीच्या क्लायंटचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्याच्या हॉटेलला रिव्हय़ू आणि कमेंट देण्याचा अर्धवेळ काम असल्याचे सांगितले. प्रत्येक रिव्हय़ूमागे 40 रुपये मिळतील असे त्यांना सांगण्यात आले.
जास्तीत जास्त रिव्हय़ू दिल्यास दिवसाला तीन हजार रुपये मिळतील असे भासवण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी होकार दिल्यावर त्याना काही लिंक पाठवण्यात आल्या. सुरुवातीला त्याना फ्री टास्क दिल्यावर त्याना प्रीपेड टास्क देण्यात आले. त्या टास्कसाठी काही अर्धी रक्कम भरावी लागणार होती. टास्क पूर्ण केल्यानंतर आधीपेक्षा अधिक कमिशन मिळणार होते. कमिशन मिळणार या भूलथापाना बळी पडून त्याने रक्कम भरून काही टास्क पूर्ण केले. टास्क पूर्ण केल्यावर त्याना काही कमिशन मिळणार होते. ती रक्कम बँक खात्यात जमा झाली असे भासवण्यात आले. तीन दिवसांत त्याने 12 लाख 14 हजार रुपयाची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
विनापरवाना सुरू होती सुरक्षा रक्षक कंपनी
विनापरवाना सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक तैनात केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी एका विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार सचिन भोसले हे ओशिवरा पोलीस ठाण्यात काम करतात. नुकतेच भोसले हे एका सोसायटी मध्ये आले. तेथे एक सुरक्षा रक्षक तैनात होता. त्याला भोसले यांनी विचारणा केली. तो एका सुरक्षा कंपनी कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यानंतर भोसले यांनी सुरक्षा रक्षक कंपनीच्या मालकाबाबत चौकशी केली. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाच्या मालकाशी संपर्क केला. तो सुरक्षा रक्षक कंपनीचा मालक हा स्वतः एका सोसायटीत सुपरवायझर म्हणून काम करत असल्याचे उघड झाले. त्याने विना परवाना पाच सोसायटी मध्ये सुरक्षा रक्षक नेमल्याचे उघड झाले. विना परवाना त्या सोसायटीत सुरक्षा रक्षक नेमले होते. ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसाला मारहाण करणाऱ्याला अटक
कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाला मारहाण झाल्याची घटना वांद्रे पूर्व परिसरात घडली. या प्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी कल्पेश गायकवाडला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
समीर भिंगारदिवे हे निर्मलनगर पोलीस ठाण्यात काम करतात. सायबर गुन्हे आणि चोरी, गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे काम करतात. सात दिवसांपूर्वी एका पोर्टलवर मोबाईल ट्रेस झाला होता. पोलिसानी एकाला फोन करून तो फोन पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगितले. शनिवारी सायंकाळी त्या व्यक्तीला पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उत्तर वाहिनीवर बोलावले. त्यानंतर समीर हे मोटारसायकलने तेथे गेले. सायंकाळी एक जण तेथे आला. रस्त्याच्या दुसऱया बाजूला त्या व्यक्तीने रिक्षा पार्क केली होती. रिक्षा पार्क केल्याने एका महिलेने त्यावर आक्षेप घेतला. तेव्हा समीर याने तो पोलीस असल्याचे त्या महिलेला सांगितले. त्याच दरम्यान महिलेने समीरशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर समीर याने पोलीस ठाण्यात चला असे त्या महिलेला सांगितले.
काही वेळात दोन महिला आणि एक पुरुष तेथे आले. त्या तिघांनी समीर याच्याशी वाद घालून चावी काढून घेतली. चावी काढून घेतल्यानंतर त्यांनी समीर याना मारहाण केली. तेव्हा त्या रिक्षाचालकाने समीर हा पोलीस असल्याचे सांगून त्यांना मारहाण करू नका असे सांगितले. तरीदेखील त्या तिघांनी समीरला मारहाण करणे सुरूच ठेवले. हा प्रकार गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांच्या लक्षात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List