ढगाळ हवामानासह पावसाचा आंबा मोहोरावर परिणाम,  पालवी कुजण्याची शक्यता 

ढगाळ हवामानासह पावसाचा आंबा मोहोरावर परिणाम,  पालवी कुजण्याची शक्यता 

गणेशोत्सवानंतर परतलेल्या पावसामुळे आंब्याला आलेली पालवी कुजून त्याचा डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये येणार्‍या आंब्याच्या मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची भिती आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. परतीच्या आणि अवेळी पावसाचे आणखीन काही दिवस सातत्य राहील्यास यावर्षीचा आंबा हंगाम नेहमीपेक्षा पंधरा दिवस लांबणीवर पडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. असे घडल्यास त्याचा यावर्षीच्या आंबा हंगामाला आणि बागायतदारांच्या उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता आहे.
यावर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये आणि त्यापूर्वी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्याचा भातशेतीला फटका बसला तरी, आंब्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरला होता. त्यातून आंब्यांच्या झाडांना चांगलीच पालवी फुटली होती. ज्याचा फायदा भविष्यामध्ये आंब्याला मोहोर येण्याला होणार होता. मात्र, गणेशोत्सवानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या वरूणराजा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा मागे फिरला आहे. त्यातून, गेल्या काही दिवसांपासून अवेळी पाऊस पडत आहे. त्याचा फटका भातकापणीच्या कामांना जसा बसत आहे तसाच आंब्यालाही बसत आहे.
पावसाने सातत्य राखल्यास मोहोरोपूर्वी आंब्यांच्या झाडांना आलेली किंवा येत असलेली पालवी कुजण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये येणार्‍या आंब्याच्या मोहोरावर होवून मोहोर येण्याचा हंगाम नेहमीच्या तुलनेमध्ये पंधरा दिवस उशीरा लांबणीवर पडण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. मोहोर लांबणीवर पडल्यास साहजिकच, त्याचा आंबा व्यवसायातून होणार्‍या उलाढालीवर प्रतिकूल परिणाम होण्याची भिती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

“ काही आंबा कलमांना पालवी आली आहे. काही झाडांना पालवी येण्याची स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये पाऊस आल्याने ही पालवी कुजण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आंब्याच्या येवूू घातलेल्या मोहोरावर होणार आहे. त्यातून, यावर्षी आंब्याला मोहोर नेहमीपेक्षा पंधरा दिवस उशीरा येण्याची शक्यता आहे. ”
मकरंद मुळ्ये, आंबा बागायतदार

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चहा पिताना तुम्हीही त्यात हे पान घाला मिळतील खूप सारे फायदे, वाचा चहा पिताना तुम्हीही त्यात हे पान घाला मिळतील खूप सारे फायदे, वाचा
चहा आणि हिंदुस्थान याचं नातं हे खूप खास आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक घराची सुरुवात ही चहाने होते. चहा बनविण्याच्या सुद्धा विविध...
ती पुन्हा त्याच वाटेवर…, अनाया बांगरने घेतला महत्त्वाचा निर्णय, व्हिडीओतून दिली माहिती
मराठी अभिनेत्याने उचलले टोकाचे पाऊल, चित्रपट प्रदर्शनापूर्वीच संपवले जीवन
प्रार्थना बेहेरेवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचं अपघाती निधन
श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर; अतिदक्षता विभागामध्ये केलं दाखल, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झेल घेताना झालेला जायबंदी
‘हे’ किडलेल्या आणि भ्रष्ट व्यवस्थेने केलेले खून, रोहित पवार यांचा संताप
डोसा करताना तुटतोय, काळजी करु नका या टिप्स वापरा