22 बोगस विद्यापीठे, यूजीसीने जाहीर केली नावे; दिल्ली आघाडीवर
मान्यता नसलेल्या देशभरातील 22 विद्यापीठांची नावे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) जाहीर केली आहेत. याने एकच खळबळ उडाली असून यात दिल्लीत सर्वाधिक म्हणजे 10 विद्यापीठे बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दिल्लीपाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये चार, आंध्र प्रदेश, केरळ, पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन तसेच महाराष्ट्र व पुद्दुचेरीमध्ये प्रत्येकी एक विद्यापीठ बोगस असल्याचा तपशील यूजीसीच्या संकेतस्थळावर आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये दिल्लीतील मान्यता नसलेल्या विद्यापीठांच्या संख्येत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशमधील अशा विद्यापीठांच्या संख्येत घट झाली आहे.
दिल्ली
एआयपीपीएचएस विद्यापीठ
कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड
युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी
वॉकेशनल युनिव्हर्सिटी
ए.डी.आर. – सेन्ट्रिक जुरीडीकल विद्यापीठ
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग
विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट
आध्यात्मिक विश्वविद्यायल
डब्ल्यूपीयूएन विद्यापीठ
इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड इंजिनीअरिंग
महाराष्ट्र
राजा अरेबिक युनिव्हर्सिटी
राज्य शासनाचा कानाडोळा
विद्यार्थी व व पालकांना मान्यता नसलेल्या विद्यापीठांची माहिती व्हावी यासाठी यूजीसीकडून दरवर्षी ऑक्टोबरमध्ये देशातील अशा विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात येते. या विद्यापीठांवर कारवाई करण्याचे निर्देशही राज्य सरकारला देण्यात येतात. राज्य शासन अशा विद्यापीठांवर कारवाई करत नसल्याने भविष्यातही अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश
गांधी हिंदी विद्यापीठ, महामाया टेक्निकल विश्वविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ, भारतीय शिक्षा परिषद
पश्चिम बंगाल
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ऑल्टरनेटिव मेडिसीन, इन्स्टिटय़ूट ऑफ ऑल्टनेटिव मेडिसीन अॅण्ड रिसर्च
आंध्र प्रदेश
क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी
बायबल ओपन युनिव्हर्सिटी
केरळ
सेंट जॉन युनिव्हर्सिटी, इंटरनॅशनल इस्लामिक विद्यापीठ
पुद्दुचेरी
श्री बोधी अॅपॅडमी
ऑफ हायर एज्युकेशन
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List