बेरोजगारी, व्यसन आणि नैराश्य ठरतेय जीवघेणे; 2023 मध्ये देशात सुमारे सात लाख, तर महाराष्ट्रात 22 हजार आत्महत्या, एनसीआरबीची धक्कादायक आकडेवारी
देशात 2023 मध्ये ज्या 7 लाख 71 हजार 418 जणांनी जीवनयात्रा संपवली, त्यापैकी 31.9 टक्के प्रकरणांत कौटुंबिक कारणे होती. व्यसनांमुळे 7, प्रेमभंगातून 4.7, नैराश्यातून 1.4 आणि बेरोजगारीतून 1.8 व आजारपणातून 19 टक्के तरुणांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. अमली पदार्थ व्यसनांतून 2023 मध्ये मुंबईत 156 आत्महत्या झाल्याची नोंद एनसीआरबीने घेतली आहे.
देशातल्या एकूण आत्महत्येपैकी एकटय़ा महाराष्ट्रात 22 हजार 687 जणांनी आत्मघाताचा मार्ग निवडला. महाराष्ट्रातील या आत्महत्यांपैकी 3150 जणांनी अमली पदार्थ, मद्यासारख्या व्यसनांमधून जीवन संपवले. आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेताना 61 टक्के म्हणजे जवळपास एक लाख जणांनी गळफास लावून घेतला. 25.4 टक्के म्हणजे 42 हजार 787 जणांनी विष पिऊन, तर 4.1 टक्के म्हणजे 7075 जणांनी पाण्यात बुडून जीव दिला.
मुंबईत 156 आणि नागपुरात 2023 मध्ये 105 तरुणांनी अमली पदार्थ, मद्याच्या सेवनातून आत्महत्या केल्याची नोंद एनसीआरबीने घेतली आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडय़ांनुसार, आत्महत्येत देशाच्या सरासरीत महाराष्ट्राचा वाटा 13.2 टक्के आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येशी त्याची सरासरी काढली तर महाराष्ट्रात दर लाख लोकसंख्येपैकी 17 जणांनी जीवनयात्रा संपवली, असे दिसून आलेय. अमली पदार्थ, मद्यासारख्या व्यसनांमुळे देशात 2023 मध्ये 11,634 जणांनी आत्महत्या केली. यात मुलींची संख्या 280 पर्यंत गेली आहे. परीक्षांमधील अपयशानंतर 2095 विद्यार्थ्यांनी जीवन संपवले. बेरोजगारीतून 3170 जणांनी जीवन संपवले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List