“हे खूप वेदनादायक…” अभिनेत्री भूमी पेडणेकरला झाला हा त्वचेचा गंभीर आजार; याची लक्षणे काय?
बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकार आपल्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेतो. पण कधी कधी काही कारणांमुळे सेलिब्रिटी काही आजांचे बळी होतात. ज्याबद्दल त्यांना स्वत:ला देखील कल्पना नसते. असंच काहीस झालं आहे अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या बाबतीत. भूमी कोणत्याही विषयाबाबत नेहमीच स्पष्ट मत मांडत आली आहे. त्याचपद्धतीने तिने तिला झालेला त्वचेच्या आजाराबद्दलही सांगितलं आहे. अलीकडेच, तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये याबद्दलचा खुलासा केला.
भूमी पेडणेकर या त्वचाआजाराने त्रस्त आहे
भूमीला या आजारामुळे त्रास होत आहे. तिला जो त्वचेचा आजार झाला आहे तो म्हणजे ‘एक्झिमा’. अभिनेत्री सध्या ‘एक्झिमा’ नावाच्या त्वचेच्या आजाराशी झुंजत आहे. भूमीने स्पष्ट केले की तिला लहानपणापासूनच हा आजार आहे. परंतु त्याचे निदान फक्त तीन वर्षांपूर्वी झाले होते.त्याबद्दल तिला एवढ्या दिवसांपर्यंत फारशी कल्पना नव्हती. तिने या आजारामुळे होणारा तिचा त्रासही तिने व्यक्त केला आहे. भूमीने स्पष्ट केले की जेव्हा जेव्हा ती खूप प्रवास करते, तेव्हा तिला पोषक आहार मिळत नाही किंवा जास्त ताण अनुभवते तेव्हा तिच्या एक्झिमामुळे पुरळ येतात किंवा तिच्या त्वचेला खाज सुटते. ही स्थिती वेदनादायक आणि अस्वस्थ करणारी आहे. भूमी म्हणाली की ती भविष्यात या विषयावर अधिक तपशीलवार चर्चा करेल जेणेकरून लोकांना ते वेळेवर समजेल आणि त्यावर ते उपचार करतील.
एक्झिमा म्हणजे काय?
एक्झिमा, ज्याला एटोपिक डर्माटायटीस असेही म्हणतात, हा एक त्वचेचा आजार आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज सुटणे, कोरडेपणा, जळजळ आणि लाल ठिपके दिसतात. हा आजार संसर्गजन्य नाही, म्हणजेच तो संपर्कातून पसरत नाही. वैद्यकीय तज्ञांच्या मते, जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती एखाद्या ऍलर्जीन होऊ शकते.
एक्झिमाची कारणे
राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) नुसार, एक्झिमा अनेक कारणांमुळे होऊ शकतो. जसं की परफ्यूम किंवा रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर, धूळ किंवा प्राण्यांच्या केसांपासून होणारी ऍलर्जी, हवामानात अचानक बदल होणे घाम येणे किंवा खूप गरम वातावरण. तसेच खाण्याच्या चुकीच्या सवयी किंवा असंतुलित आहार, ताणतणाव आणि झोपेचा अभाव, वारंवार हात धुणे किंवा खूप थंड पाण्याच्या संपर्कात राहणे. अशी बरीच कारणं आहेत ज्या हा आजार होऊ शकतो. तसेच भूमी पेडणेकरने देखील हे उघड केले आहे की तिच्यासाठी प्रवास, अस्वस्थ आहार आणि ताण हे एक्झिमा होण्याचे सर्वात मोठे कारण आहेत.
एक्झिमाची मुख्य लक्षणे
एक्झिमाची मुख्य लक्षणे म्हणजे खाज सुटणे आणि जळजळ होणे, लाल किंवा तपकिरी ठिपके, कोरडी आणि भेगा पडणारी त्वचा, लहान पुरळ किंवा फोड येणे आणि स्पर्श केल्यावर वेदना किंवा जळजळ होणे. जर ही लक्षणे पुन्हा पुन्हा जाणवत राहिली किंवा बराच काळ टिकून राहिली त्याकडे दुर्लक्ष न करता त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
एक्झिमा प्रतिबंधक टिप्स
या आजारामध्ये त्वचा वारंवार कोरडी होते. त्यामुळे त्वचेला खाज सुटण्याचे प्रमाणही जास्त वाढते. त्यामुळे ती जागा शक्य तेवढी हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. कोरडेपणा टाळण्यासाठी दररोज मॉइश्चरायझर लावा. खूप गरम पाण्यात आंघोळ करणे टाळा. रासायनिक किंवा सुगंधित साबण टाळा. ताण कमी करण्यासाठी योग किंवा ध्यान करा. भरपूर फळे, हिरव्या भाज्या खा. तसेच भरपूर पाणी प्या.
तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या
जर त्वचेवर पुरळ किंवा जळजळ वाढत असेल, तसेच सतत अंगाला खाज सुटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्हीही भूमी पेडणेकर प्रमाणे, या त्वचेच्या समस्येशी झुंजत असाल किंवा तुम्हालाही यांपैकी काही लक्षणे जाणवत असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही. थोडी काळजी आणि डॉक्टरांच्या योग्य उपचारांनी एक्झिमा नियंत्रित केला जाऊ शकतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List