मराठी भाषा भवन रखडलंय, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत नाही; पण भाजप मुख्यालयाची फाईल राफेलच्या वेगाने हलली! – संजय राऊत

मराठी भाषा भवन रखडलंय, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत नाही; पण भाजप मुख्यालयाची फाईल राफेलच्या वेगाने हलली! – संजय राऊत

केंद्रीय मंत्री अमित शहा सोमवारी मुंबईत येणार असून त्यांच्या हस्ते मरीन लाईन्स येथील निर्मला निकेतनजवळील भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन होणार आहे. पालिकेचा निवासी उद्दिष्टासाठी राखीव असलेला भूखंड भाजपने कसा पदरात पाडून घेतला याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांना पत्रही लिहिले. ही जागा भाजपा मंडळींनी सत्तेचा आणि नियमांचा गैरवापर करून ताबा मिळवला आहे का हे पाहणे गरजेचे आहे. मरीन लाईन्स येथील जागा ताब्यात घेण्यासाठी अति वेगाने फाईल्स फिरवण्यात आल्या आणि अनेक ठिकाणी सरळ जोर जबरदस्ती करण्यात आली हे स्पष्ट दिसत आहे. आपण देशातील एक जबाबदार आणि ‘प्रामाणिक ‘नेते आहात असे आपले भक्त सांगत असतात, म्हणून या जागेबद्दल काही विशेष माहिती आपल्याला देत आहे, असे राऊत यांनी पत्रात म्हटले. तसेच याबाबत सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेतही माहिती दिली.

संजय राऊत म्हणाले, देशाचे गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा मुंबईत येत असून ते नवीन कार्यालयाचे भूमिपूजन करणार आहेत. खरे म्हणजे भाजपचे एक मोठे कार्यालय आहे, पण हातामध्ये अमर्याद सत्ता आणि धनसंपत्ती असताना समुद्रासमोर मरीन लाईन्सला भव्य आलिशान कार्यालय उभे करण्याचे त्यांनी ठरवले. हजारो स्क्वेअर फूटचे ते कार्यालय आहे. नवीन किंवा नूतन कार्यालयाचे भूमिपूजन हा काही आमच्यासाठी टीकेचा विषय असू शकत नाही. राजकीय पक्षांना तो पूर्ण अधिकार आहे.

देशभरामध्ये भाजपने प्रत्येक जिल्ह्यात अशी पंचतारांकित कार्यालये उभी केली आहेत. दिल्लीतील त्यांचे कार्यालय पहाल तर प्रे. ट्रम्पचे व्हाईट हाऊस मागे पडेल. पण त्याचेही आम्ही स्वागत करतो. पक्ष आपल्या प्रॉपर्टी तयार करत असतो. सत्ता आहे, उद्योगपती पैसे देत असतात. प्रश्न इतकाच आहे की, मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकले नाही. मराठी भाषा भवन भूमिपूजन होऊनही अडकून पडले आहे. त्याकडे कुणाचे लक्ष नाही, असे राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, गृहमंत्री एक पंचतारांकित कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी येत असून त्यांचे स्वागत आहे. या कार्यालयाची फाईल किती वेगाने हलली याबाबत त्यांना पत्र लिहिले असून दैनिक सामनामध्येही छापले आहे. सत्ताधारी पक्षाची फाईल किती वेगाने हलली, राफेलचा वेगही मागे पडेल इतक्या वेगाने हलून सर्व अडथळे पार करून महापालिकेची जागा भाजपला देण्यात आली. मुंबई पालिकेत साडे तीन वर्षापासून प्रशासन आहे आणि त्या माध्यमातून सर्व व्यवहार करून घेतला.

महापालिकेत नागरी सुविधांच्या संदर्भात अनेक विषय पडले आहेत. त्यांच्या फाईल हलत नाहीत. अद्याप मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हलली नाही, तरी पण भाजपच्या पंचतारांकित मुख्यालयाची फाईल ज्या राफेलच्या वेगाने हलली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेले आहे. अमित शहा कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य, फाईल बाहेर येईल. अमित शहा अत्यंत प्रामाणिक माणूस असून त्यांना कधी दोन नंबरचे धंदे जमले नाहीत असे भक्त म्हणतात, म्हणून मी त्यांना कळवले. आपण ज्या जमिनीवर भूमिपूजनाची कुदळ मारतोय त्या जमिनीखाली हाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कोणते रहस्य पुरलेले आहे, त्याचा त्यांनी अभ्यास करावा एवढीच माझी भूमिका आहे, असेही राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चहा पिताना तुम्हीही त्यात हे पान घाला मिळतील खूप सारे फायदे, वाचा चहा पिताना तुम्हीही त्यात हे पान घाला मिळतील खूप सारे फायदे, वाचा
चहा आणि हिंदुस्थान याचं नातं हे खूप खास आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक घराची सुरुवात ही चहाने होते. चहा बनविण्याच्या सुद्धा विविध...
ती पुन्हा त्याच वाटेवर…, अनाया बांगरने घेतला महत्त्वाचा निर्णय, व्हिडीओतून दिली माहिती
मराठी अभिनेत्याने उचलले टोकाचे पाऊल, चित्रपट प्रदर्शनापूर्वीच संपवले जीवन
प्रार्थना बेहेरेवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचं अपघाती निधन
श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर; अतिदक्षता विभागामध्ये केलं दाखल, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झेल घेताना झालेला जायबंदी
‘हे’ किडलेल्या आणि भ्रष्ट व्यवस्थेने केलेले खून, रोहित पवार यांचा संताप
डोसा करताना तुटतोय, काळजी करु नका या टिप्स वापरा