लग्नात सुंदर दिसण्यासाठी करून बघा हे खास फेशियल

लग्नात सुंदर दिसण्यासाठी करून बघा हे खास फेशियल

लग्नाचा दिवस प्रत्येक मुलीसाठी खूप खास असतो. या दिवशी तिला सर्वात सुंदर दिसायचे असते, त्यामुळे या दिवसाची तयारी अनेक दिवस आधीपासूनच सुरू होते. लग्नापूर्वी, वधू पार्लरमध्ये जाते परंतु पार्लरमध्ये वारंवार जाऊन अनेकदा त्वचेचे नुकसान होते. केवळ इतकेच नाही तर, आपला खिसाही रिकामा होतो. अशावेळी नैसर्गिक चमक हवी असेल तर घरगुती उपाय सर्वोत्तम आहेत. तुम्ही वधू असाल तर, आजच राईस फेशियल करून पाहू शकता. या देसी फेशियलमुळे वधूची त्वचा चमकदार होईल. लग्नाच्या दिवशी तुम्हीही खूप सुंदर दिसाल.

वजन कमी करण्यासाठी या भाकरीचा आहारात समावेश करायलाच हवा, वाचा

राईस फेशियल करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत जाणून घेऊया. या स्टेप्सच्या मदतीने करा राईस फेशियलमुळे त्वचेवर मस्त ग्लो येतो.

राईस फेशियल कसे करावे?
साहित्य
1 – वाटी तांदळाचे पीठ
2 – चमचे कोरफड जेल
1 – चमचा साखर
2 – चमचे गुलाबजल
1 – टीस्पून कॉफी

सर्वात आधी तुमचा चेहरा स्वच्छ करा. एका भांड्यात तांदळाचे पीठ, साखर आणि कॉफी घेऊन स्क्रबिंग करावे लागेल. लक्षात ठेवा तुम्हाला फक्त 5 मिनिटे स्क्रब करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ रुमाल पाण्यात बुडवा आणि तुमचा चेहरा स्वच्छ करा.

आता ब्लॅक हेडस् काढण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, जाणून घ्या

मालिश
आता तुम्हाला एका भांड्यात बारीक तांदळाचे पीठ घ्यावे लागेल आणि त्यात कोरफडीचे जेल, बेसन, गुलाबपाणी आणि ऑलिव्ह ऑइल मिसळावे लागेल. आता या सर्व गोष्टींची पेस्ट बनवा आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर सुमारे 10-15 मिनिटे मसाज करा. यानंतर, तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवा.

फेस जेल
हे बनवण्यासाठी तुम्हाला तांदळाचे पीठ घ्यावे लागेल आणि त्यात कोरफडीचे जेल मिसळावे लागेल. आता या पेस्टने तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला 5 मिनिटे मसाज करावा लागेल.

चहा पिताना तुम्हीही त्यात हे पान घाला मिळतील खूप सारे फायदे, वाचा

फेस पॅक
शेवटी फेस पॅक बनवण्यासाठी, तुम्हाला एका भांड्यात तांदळाचे पीठ, बेसन, दही, कोरफडीचे जेल आणि मध घ्यावे लागेल. आता हे सर्व चांगले मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. यानंतर तुम्हाला ते चेहऱ्यावर लावावे लागेल आणि कोरडे होऊ द्यावे लागेल. ते पूर्णपणे सुकल्यानंतर, साध्या पाण्याने चेहरा धुवा.

या स्टेप्सच्या मदतीने, वधू लग्नापूर्वी घरी राईस फेशियल करून त्वचेवर अनोखा ग्लो आणू शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;