‘हे’ किडलेल्या आणि भ्रष्ट व्यवस्थेने केलेले खून, रोहित पवार यांचा संताप
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे या महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणावरून सध्या राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील एक ट्विट करत राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करत राज्य सरकारवर टीका केली आहे.
”संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, वैष्णवी हगवणे आणि आता डॉ. संपदा मुंडे हे किडलेल्या आणि भ्रष्ट व्यवस्थेने केलेले खून आहेत. सत्ता संवेदनशील आणि खमक्या हातात असेल तर हे रोखणं कठीण नाही, पण आज सत्तेचा वापर केवळ विरोधकाला संपवण्यासाठी आणि आपली दुकाने राखण्यासाठीच केला जातो. अशा वेळी सरकार जर आपली भूमिका योग्य पद्धतीने वठवत नसेल तर मग जनतेनेच सामूहिकपणे सरकारची वेसण ओढून वठणीवर आणण्याची गरज आहे. अन्यथा राज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे बळी यापुढंही जात राहतील आणि आपल्याला केवळ मूकपणे बघत बसावं लागेल”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List