आता ब्लॅक हेडस् काढण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, जाणून घ्या
आपल्या चेहऱ्यावर ब्लॅकहेडस् आल्यावर चेहरा अक्षरशः विद्रुप दिसू लागतो. ब्लॅकहेड्स आपल्या नाकावर आणि कपाळावर धुळीच्या कणांमुळे निर्माण होतात. परंतु योग्य ती काळजी घेतल्यामुळे, ब्लॅकहेडस् कमी होऊ शकतात. बरेचदा नाक, हनुवटी, कपाळावर आपल्या ब्लॅकहेडस् दिसतात. त्यांना काढणे थोडे कठीण असते. खासकरून धावपळीच्या वेळापत्रकात महिलांना पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळेच आपण घरच्या घरी अगदी साधे सोपे उपाय वापरून ब्लॅकहेडस् काढू शकतो.
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी या वस्तू आहेत खूप महत्त्वाच्या, वाचा
साखर आणि मध- दोन चमचे साखर घालून एक चमचा मध मिसळा. चेहऱ्यावर जिथे ब्लॅकहेडस् आहेत तिथे हे मिश्रण लावा. त्यानंतर त्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी हलक्या हाताने मसाज करा. काही मिनिटांसाठी गोलाकार मसाज करा. त्यानंतर 8 ते 10 मिनिटांसाठी त्वचेवर तसेच राहू द्यावे. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा सोपा आणि घरगुती उपाय नक्की करून बघा.
दिवाळीनंतर मधुमेही रुग्णांनी कोणत्या चाचण्या करणे आवश्यक आहे, जाणून घ्या
ओट्स आणि ग्रीन टी- एक कप ग्रीन टी तयार करा. दरम्यान, ओट्स पावडर बनवण्यासाठी दोन चमचे ओटस् बारीक करा. एका वाडग्यात ओट्स पावडर घ्या आणि त्यात आवश्यक प्रमाणात ग्रीन टी घाला. एक पेस्ट तयार करा आणि त्वचेच्या ब्लॅकहेडस् असलेल्या भागावर लावा. एक्सफोलिएट करण्यासाठी हळूवारपणे आपल्या बोटांनी मालिश करा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवावा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List