पुण्यातील कॉलेजने लंडनमधील नोकरी हिरावली, दलित तरुणाच्या आरोपाने खळबळ
‘पुण्यातील महाविद्यालयाने माझी कागदपत्रे पडताळणी नाकारल्याने मला लंडनमधील नोकरीला मुकावे लागले,’ असा आरोप एका दलित तरुणाने केला आहे. ‘केवळ दलित असल्यामुळे महाविद्यालयाने मला सहकार्य केले नाही,’ अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकली आहे.
प्रेम बिऱ्हाडे असे या तरुणाचे नाव आहे. त्याने पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातून तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यानंतर त्याला लंडनमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. कंपनीने त्याच्याकडे पदवी प्रमाणपत्र पडताळणी कागदपत्रांची मागणी केली. ‘ही कागदपत्रे मिळावीत, यासाठी मी मॉडर्न महाविद्यालयाशी संपर्क साधला. मात्र, मी दलित असल्याने कागदपत्रे देण्यास महाविद्यालयाने नकार दिला,’ असा आरोप प्रेमने केला आहे.
या आरोपानंतर ‘सम्यक विद्यार्थी संघटने’ने महाविद्यालयासमोर आंदोलन केले. तर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. या आरोपांवर मॉडर्न महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्यामकांत देशमुख म्हणाले, ‘संबंधित कंपनीला प्रेम बिऱ्हाडे याची कागदपत्रे ई-मेल केली आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List